महेश कोठारे हे एक उत्तम दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून सिनेसृष्टीत ज्ञात आहेत. दिग्दर्शन क्षेत्रात त्यांचा असलेला हातखंडा बराच मोठा आहे. एकामागोमाग एक दर्जेदार चित्रपट त्यांनी केलेत, आणि त्यांच्या या चित्रपटांना प्रेक्षकांनीही भरभरून प्रतिसाद दिला. महेश कोठारे यांच्या चित्रपटातील अभिनयाचे हुकमी एक्के म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ. यांच्याशिवाय चित्रपट पूर्ण होणे नाहीच. (Mahesh Kothare Movies)
बरं यासोबतच चित्रपटातील कॅरेक्टर रोल किंवा व्हिलन साकारणारी महेश कोठारे यांची टीमही ठरलेली होती. त्यामुळे लक्ष्या आणि अशोकमामांशिवाय बिपीन वर्टिने, जयराम कुलकर्णी आणि विजय चव्हाण यांच्याशिवाय महेश कोठारे यांच्या सिनेमाची फ्रेम पूर्ण झालीच नाही. या तीन ही कलाकारांनी त्यांना मिळालेल्या प्रत्येक भूमिकेचं सोन करून चित्रपटसृष्टीत आपलं नाव कमावलं.
पहा कोणत्या कलाकारांशिवाय अपूर्ण होते कोठारेंचे चित्रपट (Mahesh Kothare Movies)
महेश कोठारे यांच्या चित्रपटाची खासियत म्हणजे चित्रपटात एकापेक्षा जास्त हिरो असणे. दरम्यान स्वता महेश कोठारे हे कॅमेऱ्यासमोर आणि दिग्दर्शक म्हणून कॅमेरामागे असायचेच पण लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्याही प्रमुख भूमिका असायच्या. महेश कोठारे यांच्या चित्रपटात नेहमीचे चेहरे म्हणजे लक्ष्या, अशोकमामा आणि त्यासोबतच बिपीन, जयरामकाका आणि विजूमामा हे तीन चेहरेही हमखास असायचे.(Mahesh Kothare Movies)
हे देखील वाचा – महेश कोठारेंच्या पत्नीने निवेदिता सराफ यांना चित्रपटात घेण्यासाठी दिला होता नकार
महेश कोठारे यांनी नायकालाच नव्हे तर खलनायकाला ही प्रसिध्दी मिळवून देण्याचं काम केलं. महेश कोठारे यांच्या सिनेमातील खलनायक आणि त्यांची हटके नाव हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला. झपाटलेला सिनेमातील कुबड्या खवीस साकारणारे बिपीन वर्टिने यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. थरथराट, माझा छकुला या सिनेमातही बिपीन वर्टिने यांनी साकारलेली व्हिलनची भूमिका आठवली की नागावर अक्षरशः काटे उभे राहतात. कुबड्या खवीस, कवठ्या महांकाळ या त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या त्या खलनायक म्हणूनच.
महेश कोठारेंच्या सिनेमात जयराम कुलकर्णी असं हे त्यांच्या चित्रपटांचं एक समीकरणच बनलं होत. जयराम कुलकर्णी यांनी महेश कोठारे यांच्या चित्रपटात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली. झपाटलेला, थरथराट, दे दणादण या चित्रपटातही जयराम कुलकर्णी यांनी साकारलेल्या भूमिकेने बाजी मारली.(Mahesh Kothare Movies)
महेश कोठारे यांच्या सिनेमात नेहमीच एक विनोदी टच पाहायला मिळाला. या विनोदी सीनमधून सर्वांच्या मनात घर करणारा एक अफलातून अभिनेता म्हणजे विजय चव्हाण. कॉमेडीसोबतच काही चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाच्या भूमिकाही ताकदीने पेलल्या. महेश कोठारे यांच्या चित्रपटात विनोद तर कधी डोळ्यात अंजन घालणाऱ्या संवादाचा बादशहा म्हणून विजय चव्हाण यांचीच जागा निश्चित होती.
असे फार कमी चित्रपट असतील ज्यात महेश कोठारेंनी बनवलेल्या चित्रपटात या चार व्यक्ती दिसल्या नसतील.