शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ज्योतिबा फुले पुरस्काराने नागराज मंजुळे यांचा सन्मान, अभिमानास्पद क्षण, म्हणाले, “अकरावी-बारावीत असताना…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 29, 2024 | 3:17 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi director and actor Nagraj Manjule received the Jyotiba Phule award and he shared a special post on social media.

नागराज मंजुळेंचा ज्योतिबा फुले पुरस्काराने सन्मान, सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट

दिग्दर्शक नागराज मंजुळे मनोरंजनसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांचे नेहमीच लक्ष लागलेले असते. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘फॅन्ड्री’, ‘नाळ’, ‘सैराट’ या चित्रपटांचे खूप कौतुक झाले. त्यांनी आपल्या कारकीर्दीने आजवर अनेक पुरस्कार कमावले आहेत. अशातच आता त्यांना नुकताच एक आणखी पुरस्कार मिळाला आहे. महात्मा फुले पुण्यतिथीचे औचित्य साधून गुरुवारी फुले वाडा येथील समता भूमी येथे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. (Nagraj Manjule Jyotiba Award)

नागराज मंजुळे यांना समता परिषद या संस्थेतर्फे २०२४ सालचा महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते नागराज मंजुळे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. या बातमीने चाहत्यांना आनंद झाला आहे आणि यानिमित्त त्यांनी खास सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली आहे. नागराज मंजुळे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पुरस्कार सोहळ्यामधील काही खास क्षण शेअर केले आहेत आणि आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Nagraj Popatrao Manjule (@nagraj_manjule)

आणखी वाचा – शोभिता धुलिपालाला लागली नागा चैतन्यच्या नावाची हळद, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात

नागराज यांनी हे खास फोटो पोस्ट करत असं म्हटलं आहे की, “अकरावी-बारावीत असताना मी ज्योतिबा फुलेंचं रेखाचित्र काढलं होतं. त्यांच्या विचारांचं बोट पकडून प्रवास नुकताच सुरु केला होता. आज त्यांच्याच नावानं पुरस्कार मिळवा ही अत्यंत आनंदाची आणि सार्थकतेची गोष्ट आहे. कृतज्ञ”. त्यांच्या या पोस्टवर अभिनेता सिद्धार्थ जाधव, उत्कर्ष शिंदे यांनी कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्यांच्या अनेक चाहत्यांनीही नागराज मंजुळे यांना “अभिनंदन”, “शुभेच्छा” व “अभिमान आहे” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा – काही महिन्यांपूर्वी निर्माते कृष्ण कुमार यांच्या लेकीचा झालेला मृत्यू, पण कॅन्सर नव्हे तर दुसरंच होतं कारण, आईचा मोठा खुलासा

दरम्यान, मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट घेऊन येणारे नागराज मंजुळे आता ओटीटी विश्वात एक रंजक सीरिज घेऊन येत आहेत. लवकरच त्यांची ‘मटका किंग’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये सई ताम्हणकर व सिद्धार्थ जाधव हे कलाकारही पाहायला मिळणार आहेत. तसंच त्यांचा ‘खाशाबा’ आगामी सचित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  

Tags: Jyotiba Awardnagraj manjuleNagraj Manjule Jyotiba AwardNagraj Manjule News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Devmanus fame actor Kiran Gaikwad confess his love affair actress Vaishnavi Kalyankar Know more about

'देवमाणूस' फेम किरण गायकवाडची होणारी बायको नक्की आहे कोण?, मराठी मालिकांमध्येही केलंय कमालीचं काम, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.