मराठी इंडस्ट्रीत लग्नसराईला सुरुवात झाली आहे. अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने नुकतंच लग्न केलं आहे. रेश्माच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू असताना आणखी एका टेलिव्हिजन अभिनेत्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे. हा अभिनेता म्हणजे ‘देवमाणूस’ मालिकेतील डॉक्टर म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड याने प्रेमाची कबुली दिली आहे. किरणने होणाऱ्या बायकोबरोबरचा फोटो शेअर करत चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे. किरणने खास पोस्ट देखील लिहिली आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या फोटोवर कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पण ही वैष्णवी नक्की आहे तरी कोण? चला जाणून घेऊ… (Kiran Gaikwad Wife)
‘देवमाणूस’ मालिकेतून वैष्णवी प्रसिद्धी झोतात आली. या मालिकेत तिने सोनाली उर्फ सोनू ही भूमिका साकारली होती. खरंतर तिची ही पहिली मालिका आहे. वैष्णवी ही मूळची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा शहरातली आहे. डी. जी. रुपारेल कॉलेजमधून तिने शिक्षण पूर्ण केले आहे. वैष्णवीला नृत्य आणि अभिनय करायला आवडतो. अभिनेत्री काही सीरिज व चित्रपटांमधून प्रेक्षकांची भेटीला आली आहे. तू चाल पुढं या मालिकेतही तिने प्रमुख भूमिका साकारली होती. तर ‘बांबू’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. वैष्णवी तिच्या अभिनय आणि सौंदर्यामुळे वैष्णवी एक सोशल मीडियावरील स्टार बनली.
किरणने त्याच्या प्रेमाची कबुली देत खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने “तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस. पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायचं ठरवलं आहे. मंत्रिमंडळल्या बैठका होत राहतील, मंत्री पद वाटत राहतील. त्यांचं ठरतय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो. ही आहे माझी होणारी “होम मिनिस्टर” असं म्हणत त्याने प्रेमाची कबुली दिली. तर त्याची होणारी बायको वैष्णवी कल्याणकरनेही “तू आणि तूच” ही आनंदाची बातमी दिली आहे.
आणखी वाचा – ज्योतिबा फुले पुरस्काराने नागराज मंजुळे यांचा सन्मान, अभिमानास्पद क्षण, म्हणाले, “अकरावी-बारावीत असताना…”
दरम्यान, किरणच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘लागीरं झालं जी’ या मालिकेतून तो घराघरांत पोहोचला ‘देवमाणूस’ ही त्याची दुसरी मालिका होती. ही मालिका क्राइम प्रकारात मोडणारी असली तरी प्रेक्षकांनी मालिकेला डोक्यावर घेतलं होतं. त्यानंतर किरणची मोठ्या पडद्यावर एन्ट्री झाली. तसंच तो लवकरच दिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘एफ.आय.आर. ४६९’ हा किरण गायकवाडने दिग्दर्शन केलेला आगामी चित्रपट आहे. त्यामुळे आता अनेकजण त्याच्या चित्रपटासह लग्नाचीही आतुरेतेने वाट पाहत आहेत.