अभिनेतेने-निर्माते आणि टी-सिरीजचे सह-मालक कृष्ण कुमार यांची २० वर्षीय मुलगी तिशा कुमार जुलै २०२४ रोजी दीर्घ आजारामुळे मरण पावली. तिशाचा मृत्यू कर्करोगाच्या निदानामुळे झाला होता, मात्र आता कृष्ण कुमारची पत्नी आणि तिशाची आई तान्या यांनी खुलासा केला आहे की त्यांच्या मुलीला कॅन्सर झाला नसून तिच्या मृत्यूचे कारण काहीतरी वेगळे होते. तिशा ही टी-सीरीजचे सीईओ भूषण कुमार यांची चुलत बहीण होती. तिशा कुमारच्या निधनानंतर आता काही महिन्यांनी, कृष्ण कुमारची पत्नी तान्या यांनी आता तिच्या मृत्यूचे खरे कारण उघड केले आहे. तान्या यांनी तिच्या इन्स्टाग्रामवर तिशाबरोबरचे काही फोटो व व्हिडीओ शेअर एक लांबलचक पोस्ट शेअर करत मृत्यू कर्करोगाने झाला नसल्याचा खुलासा केला आहे. (tishaa kumar demise reason)
दुसऱ्याच्या ‘वाईट कर्मामुळे’ मुलगी तिशाला आपला जीव गमावल्याचा दावा त्यांनी या पोस्टमधून केला आहे. तान्या यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘कसे, काय, का’, बरेच लोक लिहित आहेत आणि मला काय झाले विचारत आहेत. सत्य हे व्यक्तिनिष्ठ आणि एखाद्या व्यक्तीला कसे समजते याच्याशी सापेक्ष असते, जेव्हा एखाद्या शुद्ध निष्पाप जीवावर एखाद्याच्या/कोणत्यातरी वाईट कृत्यामुळे अन्याय होतो तेव्हा गोष्टी गुंतागुंतीच्या आणि गोंधळात टाकतात आणि याला खूप उशीर झालेला असतो”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “कोणीही त्याच्या कृत्यांच्या क्रोधापासून वाचू शकत नाही, जसे मी मागील पोस्टमध्ये म्हटले आहे. ‘कधीकधी तुमचे संपूर्ण अस्तित्व दुसऱ्यावर अवलंबून असते ‘वाईट कर्माचे’, तुमचे नाही! तत्त्वज्ञान काहीही म्हणत असले तरी, औषध हा (चुकीच्या) निदान आणि (चुकीच्या) पद्धतींचा व्यवसाय आहे. तेथे इतर कोणी काय विचार करतात हे महत्त्वाचे नाही, कारण आपल्याला काय माहित आहे हे कोणालाही माहित नाही आणि कालांतराने सत्य स्वतःच समोर येईल”.
आणखी वाचा – मोठी बातमी! शिल्पा शेट्टीच्या घरावर ईडीची धाड, नवरा राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणी कारवाई
यापुढे तान्या यांनी असं म्हटलं आहे की, “माझी मुलगी तिशाला, काहीही झाले तरी ती कधीही भीती किंवा नैराश्याची शिकार झाली नाही. सत्य हे आहे की, माझ्या मुलीला सुरुवातीपासूनच कॅन्सर नव्हता. तिला वयाच्या १२-१५ व्या वर्षी एक लस देण्यात आली ज्यामुळे तिची स्वयंप्रतिकार स्थिती निर्माण झाली. तिचे चुकीचे निदान झाले (त्यावेळी आम्हाला हे माहित नव्हते). पालकांनो, तुमच्या मुलाला नुकतीच ‘लिम्फ नोड्सची सूज’ आहे, तर कृपया ‘बोन-मॅरो’ चाचणी किंवा लिम्फ नोड्ससाठी जाण्यापूर्वी दुसरे आणि तिसरे मत घ्या”.
यापुढे त्यांनी या पोस्टद्वारे असं म्हटलं आहे की, “लिम्फ नोड्स हे शरीराचे संरक्षण रक्षक असतात आणि ते भावनिक आघात इत्यादीमुळे किंवा पूर्वीच्या संसर्गामुळे ज्यावर योग्य उपचार केले गेले नाहीत त्यामुळे ते सूजतात. आम्हाला ही सर्व माहिती मिळण्यापूर्वीच आम्ही ‘वैद्यकीय सापळ्यात’ अडकलो होतो. मी दररोज प्रार्थना करते की, कोणत्याही मुलाला कधीही वैद्यकीय सापळ्यांच्या किंवा नकारात्मक शक्तींच्या या क्रूर जगाचा सामना करावा लागू नये”.