दाक्षिणात्य कलाकार नागा चैतन्य सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. अभिनेत्री शोभिता धूलिपालाबरोबर तो लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काही महिन्यांपूर्वी दोघांचाही साखरपुडा थाटामाटात संपन्न झाला. त्यांचे फोटो जेव्हा समोर आले तेव्हा त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आता त्यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा हळदी समारंभ आज, २९ नोव्हेंबर रोजी हैदराबादमध्ये पार पडला. हळदीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Naga Chaitanya and Sobhita Dhulipala Haldi Ceremony)
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा हळदी समारंभ त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी हे जोडपे पारंपारिक लूकमध्ये दिसले. नागा चैतन्यच्या नववधू शोभिताने तिच्या हळदी समारंभासाठी दोन पोशाख परिधान केले होते. शोभिताने हळदीसाठी पिवळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. सोन्याच्या दागिन्यांसह अभिनेत्रीने तिचा खास केला आहे. या फोटोंमध्ये ती हळदीच्या रंगात रंगलेली दिसत आहे.
आणखी वाचा – शुभमंगल सावधान! अभिनेत्री रेश्मा शिंदे अडकली विवाहबंधनात, मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष, पहिला फोटो समोर
हळदी समारंभात नागा चैतन्य कुर्ता पायजमामध्ये दिसला. हळदीच्या काही सर्वोत्तम क्षणांचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. दोघांच्या लग्नाच्या काही दिवस आधी अशी अफवा पसरली होती की, या जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या चित्रपटाचे हक्क नेटफ्लिक्सला ५० कोटींना विकले होते. मात्र, नागा चैतन्यने या वृत्ताचे खंडन केले आणि ‘झूम’शी साधलेल्या संभाषणात सांगितले की, “ही खोटी बातमी आहे. असा कोणताही करार झालेला नाही”.
आणखी वाचा – मोठी बातमी! शिल्पा शेट्टीच्या घरावर ईडीची धाड, नवरा राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणी कारवाई
दरम्यान, नागा चैतन्यचे शोभिताबरोबर हे दुसरं लग्न आहे. याआधी त्याचे लग्न समंथाबरोबर झाले होते. २०१७ साली ते लग्नबंधनात अडकले होते आणि २०२१ साली त्यांचा घटस्फोट झाला. नागा चैतन्यने एका मुलाखतीमध्ये घटस्फोटानंतर नैराश्य आल्याचे सांगितले होते. अशातच आता काही वृत्तानुसार, नागा चैतन्य आणि शोभिता ०४ डिसेंबर रोजी हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये विवाहबंधनात अकडणार आहेत.