शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुम्हीही कंटाळलात ना?”, ‘सुख म्हणजे…’मधून बाहेर पडल्यानंतर वर्षा उसगांवकरांना चाहत्याचा प्रश्न, म्हणाल्या, “मला गहिवरुन आलं आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 26, 2024 | 6:04 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Varsha Usgaonkar exit from serial

"तुम्हीही कंटाळलात ना?", 'सुख म्हणजे...'मधून बाहेर पडल्यानंतर वर्षा उसगांवकरांना चाहत्याचा प्रश्न, म्हणाल्या, "मला गहिवरुन आलं आणि..."

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असत’ ही मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना अक्षरशः खुर्चीत खिळवून ठेवलं आहे. मालिकेतील सर्वच कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. जयदीप-गौरी, नित्या-अधिराज या पात्रांबरोबर माई हे पात्रही महत्त्वपूर्ण होतं. अशातच या पात्राने नुकताच मालिकेचा निरोप घेतला असल्याचं समोर आलं आहे. अलीकडच्या एपिसोडमध्ये माईचा दुर्दैवी अंत दाखवण्यात आला. (Varsha Usgaonkar exit from serial)

मालिकेत माईंची ही भूमिका अभिनेत्री वर्षा उसगांवकर साकारत होती. नव्वदीच्या दशकात आपल्या अभिनयाने व सौंदर्याने प्रेक्षकांना मोहिनी घालणारी अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. मराठी सिनेसृष्टीचा एक काळ वर्षा यांच्या नावावर होता. सिनेविश्वात काम करताना त्यांनी मालिकेकडे पाठ फिरवली होती. त्यानंतर आता तब्बल दहा वर्षांनी त्यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेतून मालिकाविश्वात कमबॅक केलं होतं.

आणखी वाचा – अनंत अंबानीच्या हळदीत ढोल वाजवत होता रणवीर सिंग, तर हार्दिक पांड्याच्या डोक्यावर फुलांची टोपली, नेटकरी म्हणाले, “फक्त पैसे…”

View this post on Instagram

A post shared by Varsha Usgaonker (@varshausgaonker)

वर्षा यांनी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतून एक्झिट घेतली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ त्यांनी त्यांच्या ऑफिशिअल पेजवरुन शेअर केला आहे. वर्षा यांनी मालिकेतील पात्राचा प्रवास संपल्याने मालिकेतून एक्झिट घेत असल्याचं सांगितलं. वर्षा यांच्या या चित्रपटातून एक्झिट घेण्याने प्रेक्षकांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे. ही मालिका बऱ्याच काळापासून सुरु असल्याने याचा गोड शेवट करुन मालिका संपवावी असंही काहींनी म्हटले आहे.

आणखी वाचा – फराह खानच्या आईचं निधन, काही दिवसांपूर्वीच दणक्यात साजरा केला होता ७६वा वाढदिवस, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

अशातच मालिकेतून निरोप घेतल्यानंतर ‘माझं सुखाच माहेर सुटलं’ असं कॅप्शन देत वर्षा यांनी मालिकेतील जयदीप या पात्राबरोबरचे खास क्षण व्हिडीओद्वारे शेअर केले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्यांना मिस करणार असल्याचं म्हटलं आहे. यावर एका नेटकऱ्याने कमेंट करत “शेवटी तुम्हीही कंटाळलात ना? आमचे काय हाल होत असतील जरा विचार करुन पाहा”, असं म्हटलं आहे. यावर प्रतिउत्तर देत “मी नक्कीच कंटाळले नाही आहे. याउलट मला गहिवरुन आलं. तुमची गोष्ट वेगळी आहे. ठीक आहे तुमच्या मताचा मी आदर करते”, असं उत्तर वर्षा यांनी दिलं आहे.

Tags: marathi serialsukh mhanje nakki kay astavarsha usgaonkarVarsha Usgaonkar exit from serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Paaru Troll By Netizens

"गावठी भाषा वापरते आणि…", 'पारू'वर प्रेक्षकांचा संताप, भाषेवरही निर्माण केले प्रश्नचिन्ह, म्हणाले, "हिचा खूप कंटाळा येतो कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.