गेल्या काही दिवसांपासून देशभरात महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. राजस्थान, उत्तर प्रदेश, कोलकाता आणि महाराष्ट्रातून सर्वाधिक अत्याचाराचे अनेक प्रकरणं उजेडात आली आहेत. अशातच आता याबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे ज्या लोकप्रतिनिधींना आपण निवडून देतो त्यांच्यावरच महिलांविरोधात अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. एवढंच नव्हे तर काही लोकप्रतिनिधींवर बलात्काराचाही आरोप आहे. कोलकाता बलात्कार प्रकरण आणि बदलापूरमधील दोन मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणानंतर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मने यासंदर्भातील अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालामुळे महिला सुरक्षित कशा राहतील? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Urmila Nimbalkar On Rape And Crimes Against Women)
गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचारांच्या घटनेवर मनोरंजन, क्रीडा, सामाजिक व राजकीय अशा अनेक स्तरातून रोष व्यक्त केला जात आहे. बदलापूरमधील चिमूकल्यांवर झालेल्या घटनेनंतर अवघा देश रस्त्यावर उतरला आहे. निवडणूक अधिकार मंडळाच्या अलीकडील अहवालानुसार, सुमारे १५१ विद्यमान खासदार आणि आमदारांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांमध्ये महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणे घोषित केली आहेत. यावर अनेकांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच अभिनेत्री उर्मिला निंबाळकरनेदेखील यावर आपली प्रतिक्रिया देत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

उर्मिलाने लोकप्रतिनिधींवर महिलांविरोधात असलेल्या गुन्ह्यांचे वृत्त शेअर करत असं म्हटलं आहे की, “ही संपूर्ण पोस्ट वाचली की आपल्या लक्षात येतं आपण कोणाला मतदान करतो? सोशल मीडियावर त्रागा व्यक्त करणे, मेणबत्या लावणे, सर्व पुरुष वर्गाला शिव्या घालणे?यापेक्षा आपलं मत नक्की कोणाला जातं? आपल्या आसपासच्या समाजामध्ये खऱ्या अर्थाने जनजागृती करण्यासाठी आपले योगदान काय असावे? याचा विचार व्हावा”.
दरम्यान, ज्या लोकांकडून कठोर कायदे करुन आरोपीला शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. त्यांच लोकप्रतिनिधींवर बलात्कारासारखे गंभीर गुन्हे असणे ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. देशातील महिलांच्या सुरक्षेची खात्री कशी करायची याची चिंता सर्वसामान्यांपासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वांना सतावत आहे. आशातच कायद्याचे निर्मातेच जर कलंकित असतील तर देशातील मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? हादेखीलएल मोठाचं प्रश्न आहे.