Titeeksha Tawade and Siddharth Bodke : अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके ही जोडी नेहमीच चर्चेत असणाऱ्या जोडींपैकी एक आहे. सोशल मिडियावरही दोघे नेहमीच एकमेकांबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. तितीक्षाचे रील, व्हिडीओ नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून तितीक्षाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आज ही मालिका संपूर्ण बराच काळ लोटला असला तरी ही मालिका आणि मालिकेतील तितीक्षाची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. याशिवाय तिने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सध्या तितीक्षा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ते म्हणजे तिच्या प्रेग्नन्सीमुळे.
तितीक्षाने नुकत्याच इट्स मज्जाच्या गुढीपाडवा स्पेशल सेगमेंटमध्ये या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तितीक्षा म्हणाली, “माझं वजन वाढलं आहे. मी प्रेग्नेंट नाही आहे. एवढी मी जाड झाली आहे का?, आम्हाला सुद्धा कुटुंब हवं आहे पण आता ती वेळ नाही आहे. अर्थात आम्ही दोघांनी याबाबत विचारही केला आहे. पण आता सध्या आम्हाला सेटल व्हायचं आहे. खूप प्रोजेक्ट समोर आहेत”.
आणखी वाचा – ‘तारक मेहता…’मध्ये आठ वर्षांनी येणार दयाबेन, शूटिंगही केलं सुरु, दिशा वकानी ‘या’ भूमिकेत पुन्हा दिसणार का?
याबाबत सिद्धार्थने त्याच मत मांडत म्हटलं की, “गंमत अशी आहे, याचा विचार जरी केला तरी आधी खूप भीती वाटायची. खूप प्रेशर यायचा. म्हणजे आम्ही ही गोष्ट करायला आता लगेच तयार आहोत का?, तर तसं नाही आहे. म्हणजे आमच्या घरात दोन कलाकार आहेत. त्यांना दोन बाळ आहेत. आणि त्या दोघांना ती दोघं खूप सहज सांभाळतात. तर त्यांच्याकडे पाहून आम्हाला उगीच असं वाटतं की हा आम्ही ठरवलं तर आम्हीसुद्धा हे आरामात करु, आमच्या बाळांना सांभाळू. आपण उगीचच याचा स्ट्रेस घेतोय”.
यानंतर तितीक्षा म्हणाली, “लग्नानंतर आम्ही खूप फिरलो नाही आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं आहे की, हे वर्ष आम्ही खूप फिरणार आहे. कारण जेव्हा केव्हा आम्ही प्लॅन करु त्यानंतर फिरणं कठीण होणार आहे. म्हणून प्रेग्नन्सी आधी आम्ही फिरुन घ्यायचं ठरवलं आहे”.