Shashank Ketkar : मराठमोळा अभिनेता शशांक केतकर नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असतो. शशांकने आजवर अनेक न पटलेल्या मुद्द्यांवर स्पष्टपणे भाष्य केलं आहे. बेधडक वक्तव्यांमुळे शशांक नेहमीच चर्चेत असतो. बऱ्याचदा तो समाजात आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींबाबत व्हिडीओ शेअर करत सत्य परिस्थिती दाखवतो. अशातच शशांकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्याने प्रचंड संताप व्यक्त केला आहे, त्यामुळे हा व्हिडीओ साऱ्यांचं लक्ष वेधून आहे. शशांकने हा व्हिडीओ त्याच्याबरोबर झालेल्या फसवणुकीबाबत शेअर केला आहे आणि एकप्रकारे जाब विचारला आहे.
फसवणुक प्रकरणाबाबत शशांक केतकर नेमकं काय म्हणाला?
शशांकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं की, “यार मी काय करु? मीरा रोडला बारा वर्षांपूर्वी मी एक घर घेतलं आहे. ते अजून मला मिळालेलं नाही. कारण त्यावर सरकारचा सील आहे. कुणाबद्दल आणि कशी कॉमेडी करु म्हणजे एकतर ती बिल्डिंग पाडली जाईल किंवा मला परत कुणीतरी बांधून देईल. काय करु? बँकेकडून ऑफिशिअल लोन घेतलं होतं, पैसे भरुन झाले आहेत. पण, घर काही मिळालं नाही. आणि फक्त मुंबईतच काय, महाराष्ट्रातच काय, भारतात असे लाखो कॉम्प्लेक्स आहेत जे उभे राहताना काहीतरी तिथे अवैध घडतंय, हे तिथल्या प्रशासनाला कळत नाही. आमच्याकडून रजिस्ट्रेशनचे पैसे घेताना हे कळत नाही?, आमचे पैसे जातात घर मिळत नाहीत, बँकांना लोन देताना हे कळत नाही, आता कुणाबद्दल कॉमेडी करु”.
आणखी वाचा – “फसवणुकीचे आरोप खोटे…”, श्रेयस तळपदेच्या टीमचे स्पष्टीकरण, म्हणाले, “फसव्या किंवा बेकायदेशीर कृत्यांशी…”
तर हा व्हिडीओ शेअर करत त्याखाली कॅप्शन देत त्याने असं म्हटलं आहे की, “सामान्य माणसांनी काय करायचं? कष्टाच्या पैशातून घर घेण्याचं स्वप्न पाहीलं. १२ वर्ष झाली, घर बुक करुन. लोन सुध्दा फेडून झालं, पण घरचा ताबा मिळण्याची शक्यताही अजून दिसत नाही. सुप्रीम कोर्टात केस सुरु आहे. दर तारखेला. पुढची तारीख मिळते. पण तिथेही निकाल लागत नाही. झाडून सगळ्या राजकारण्यांकडे कसे मोठे बंगले आणि अनेक गाड्या असतात? आम्हा सामान्य जनतेला हे गुपित सांगा ना! सांगा कसं जगायचं… (आनंदानी, अभिमानानी आणि समाधानानी)”.
आणखी वाचा – ‘तारक मेहता…’मध्ये सात वर्षांनी पुन्हा येणार दयाबेन, मालिकेतील अभिनेत्रीनेच केला खुलासा, “या पात्रासाठी…”
शशांक केतकरला नेटकऱ्यांचा पाठिंबा
“हीच मला भीती आहे म्हणुन मी घर घेत नाहीये, आपण पैसे भरून घर मिळालं नाहीच तर काय अवघडच आहे “, “तुम्हाला घर लवकर मिळो हिच प्रार्थना”, “ते घर घेण्यासाठी एखाद्याने त्याच्या आयुष्याची जमापुंजी लावुन दिलेली असते पण या बिल्डर लोकांना काही वाटत नाही”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी शशांकच्या पोस्टला आणि शशांकला पाठिंबा दर्शविला आहे.