रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विवेक ओबेरॉयच्या लग्नात सगळ्या एक्स गर्लफ्रेंडस् आल्या अन्…; अभिनेत्यानेच केला होता खुलासा, म्हणाला, “रिलेशनशिपमध्ये फसवणूक झाल्यानंतर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 20, 2023 | 7:02 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Vivek oberoi reveals exgirlfriends came to his wedding

Vivek oberoi reveals exgirlfriends came to his wedding

बॉलिवूडमधील कलाकारांच्या अफेअर्सच्या चर्चा बऱ्याचदा होताना दिसतात. त्यातील विवेक ओबेरॉय व ऐश्वर्या रॉय यांचं अफेअर असं आहे जे बॉलिवूडमध्ये बरंच गाजलं होतं. बऱ्याचदा यावर अनेक खुलासे होताना दिसतात. या नात्याबद्दल विवेक बऱ्याच वेळा मुलाखतीत बोलताना दिसतो. आताही त्याने एका मुलाखतीत यावर वक्तव्य केलं. त्यावेळी त्याने त्याच्या अफेअर्सबद्दल खुलासे केले. (Vivek oberoi reveals exgirlfriends came to his wedding)

विवेक व ऐश्वर्याची लवस्टोरी ही इंडस्ट्रीतील खूप मोठा चर्चेचा विषय होता. ऐश्वर्याचा सलमान खानबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर विवेक व ऐश्वर्याने एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. मात्र, त्यांचं नात फार काळ टिकलं नाही. २००५ मध्ये दोघं एकमेकांपासून वेगळे झाले. त्यामागचं कारण सांगताना विवेक दावा करतो की, त्याच्याबरोबर ऐश्वर्याने न राहण्याची सलमान खानने धमकी दिली होती. या सगळ्याचा परिणाम त्याच्या करिअरवरही झाल्या असल्याचेही तो बोलला होता. आता बऱ्याच वर्षानंतर विवेकने त्यांच्या नात्याबद्दल आणि भूतकाळाबद्दल खुलासा केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Bollywood Tonic (@bollywoodtonic)

आणखी वाचा – Ind Vs Ban : शुभमन गिलचं अर्ध शतक होताच सचिन तेंडुलकरची लेक साराचा एकच जल्लोष, ‘तो’ व्हिडीओ पाहिल्यानंतर अफेअर्सच्या चर्चांना उधाण

अलीकडेच विवेकने ‘अनस बौखश’च्या पॉडकास्टशी संवाद साधला. त्यावेळी त्याने त्याच्या भूतकाळातील गोष्टींबाबत वक्तव्य केले. याबाबत बोलताना त्याने सांगितलं की, कशाप्रकारे त्याला भूतकाळातील नात्यांमध्ये धोका मिळाला आहे. यावेळी कोणाचंही नाव न घेता त्याने ऐश्वर्या राय बच्चनबरोबरच्या ब्रेकअपबद्दल वक्तव्य केलं. ऐश्वर्यानंतर विवेक मॉडेल गुरप्रीत गिलला डेट करत होता. पण तिच्याकडूनही तिला धोका मिळाला. त्यानंतर त्यांची भेट प्रियांका अल्वासह झाली. तिच्याबरोबर लग्न झाल्यानंतर त्याच्या आयुष्याला नवीन वळण आलं. त्यानंतर त्याने त्याचं आयुष्य खाजगी ठेवलं.

View this post on Instagram

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

आणखी वाचा – Video : हेमा मालिनी यांच्या बर्थडे पार्टीमध्ये धर्मेंद्र यांच्या पायाजवळच बसून राहिला सलमान खान, जमीनीवरच बसला अन्…; व्हिडीओ व्हायरल

याबद्दल वक्तव्य करताना तो बऱ्याचदा कॅज्युअल डेटिंगपासून ते सीरियस रिलेशनशीपपर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलताना तो सांगतो, “रिलेशनशीपमधून फसवणूक मिळाल्यानंतर माझा प्रेमावरून विश्वास उडाला. मी त्यानंतर २९ ऑक्टोबर २०१० ला प्रियांका अल्वाबरोबर लग्न केलं आणि तिच्यातच प्रेम शोधलं. असा माझ्या बऱ्याच एक्स गर्लफ्रेंड होत्या. ज्यांच्याबरोबर माझं चांगलं नातं होतं आणि त्या सगळ्या जणं माझ्या लग्नात उपस्थित होत्या”. विवेक ओबेरॉयने २९ ऑक्टोबर २०१०ला प्रियांका अल्वाबरोबर लग्न केलं. त्यांना २ छान मुलं ही आहेत. त्याच्या मुलाचं नाव विवान तर त्याच्या मुलीच नाव अमेया असं आहे.

Tags: bollywood actorVivek oberoi
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Pradeep Velankar 75th Birthday Celebration

औक्षण, पार्टी थीम, धमाल अन्…; प्रदीप वेलणकरांच्या ७५व्या वाढदिवसाची जोरदार पार्टी, अशोक मामांसह मराठी कलाकारांची हजेरी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.