सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची चिमुकली लेक आतापासूनच करत आहे स्वामी समर्थांची भक्ती, शेअर केला व्हिडीओ, म्हणाली, “स्वामी आबा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 28, 2024 | 3:46 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Surabhi Bhave Daughter Video

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची चिमुकली लेक आतापासूनच करत आहे स्वामी समर्थांची भक्ती, शेअर केला व्हिडीओ, म्हणाली, "स्वामी आबा…"

मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहऱ्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री सुरभी भावे. सुरभी भावे हिने आजवर अनेक मराठी मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली. कलर्स मराठी वाहिनीवरील स्वामिनी या मालिकेमुळे सुरभीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या ऐतिहासिक मालिकेतील सुरभीच्या पात्राची बरीच चर्चा रंगली. तर जय मल्हार मालिकेतील ‘म्हाळसा’ या पात्राच्या भूमिकेनेही सुरभीला विशेष ओळख दिली. मालिकाविश्वामुळे चर्चेत असणारी सुरभी तिच्या वैयक्तिक कारणामुळेही चर्चेत असते. (Surabhi Bhave Daughter Video)

मालिकाविश्वात सक्रिय असणारी सुरभी सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय आहे. नेहमीच ती सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. सुरभी नेहमीच तिच्या लेकीबरोबर धमाल मस्ती करतानाचे अनेक फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते. अशातच अभिनेत्रीने तिच्या छोट्याश्या लेकीबरोबर शेअर केलेल्या एका गोड व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आणखी वाचा – नवऱ्यासह ऑस्ट्रेलियामध्येच राहत आहे पूजा सावंत, असं जगत आहे आयुष्य, बायकोसाठी सिद्धेशने बनवला पुलाव, म्हणाली, “माझ्या नवऱ्याने…”

View this post on Instagram

A post shared by Surabhi Bhave❤️ (@surabhibhave)

सुरभीने तिच्या स्वामीभक्त लेकीबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यांत तिची लेक स्वामी समर्थ यांच्याबरोबर संवाद साधताना दिसत आहे. सुरभी ही स्वामीभक्त आहेच, आता आईपाठोपाठ तिची लेकही स्वामीभक्त असलेली या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतेय. सुरभीने तिच्या लेकीचा हा व्हिडीओ शेअर करत, “मी स्वामी समर्थांची भक्ती करते आणि आता माझी छोटीशी लेक पण त्यांची भक्त आहे ,रोज आम्ही स्वामी आबा स्वामी आबा म्हणत त्यांच्याशी गप्पा मारतो ,आता तिला स्वामी आबांना आंबा खायला द्यायचा आहे आणि तिच्या म्हणण्यानुसार ते अंघोळीला गेलेत. किती निरागस !! आमचं संभाषण ऐका”, असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – “एकांकिकेची जागा रीलने घेतली अन्…”, प्रथमेश परबने शेअर केलेली पोस्ट चर्चेत, म्हणाला, “रंगमंच जगेल…”

हा व्हिडीओ पाहून सुरभीच्या लेकीची निरागसता साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. अनेकांनी या व्हिडीओला पसंती दर्शविली असून कमेंटचा वर्षाव ही केला आहे.

Tags: entertainmentmarathi actorsurabhi bhaveSurabhi Bhave Daughter Video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Ada sharma on twitter post

"दहशतवादी खलनायक असतात मुसलमान नाही", इफ्तार पार्टीला गेलेल्या अदा शर्माचं विधान, ट्रोलर्सला उत्तर देत म्हणाली, "कोणताही दिवस…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.