शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बऱ्याच गोष्टी माझ्या कानावर आल्या पण…”, हॉटेल बंद झालं असल्याच्या चर्चांवर सुप्रिया पाठारेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या, “आई गेली आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 3, 2023 | 10:38 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Supriya Pathare Video

“बऱ्याच गोष्टी माझ्या कानावर आल्या पण…”, हॉटेल बंद झालं असल्याच्या चर्चांवर सुप्रिया पाठारेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या, “आई गेली आणि…”

अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी आजवर त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंच आहे. सुप्रिया पाठारे या अभिनयाव्यतिरिक्त त्यांच्या नव्या व्यवसायामुळेही चर्चेत असतात. सुरुवातील फूड ट्र्कपासून सुरु केलेल्या या व्यवसायाने हॉटेल पर्यंत धाव घेतली आहे. सुप्रिया यांनी त्यांच्या लेकासह मिळून ‘महाराज’ हे नवं हॉटेल सुरु केलं आहे. अनेक कलाकार मंडळी त्यांच्या या हॉटेलला भेट देत असतात. दरम्यान त्यांच्या या हॉटेलमध्ये कलाकारमंडळी पदार्थांचा आस्वाद घेतानाचे अनेक फोटोही सोशल मीडियावरून पोस्ट करण्यात आले आहेत. (Supriya Pathare Video)

मात्र सध्या सुप्रिया पाठारे यांच्या ‘महाराज’ या हॉटेलची एक वेगळीच चर्चा सुरु आहे. हे हॉटेल बंद झालं आहे, अशा अनेक अफवा पसरवण्यात आल्या होत्या. यावर आता थेट सुप्रिया पाठारे यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. सुप्रिया पाठारे यांनी हॉटेल काही दिवस बंद का होतं, याचं स्पष्टीकरण देत एक व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी त्यांच्या हॉटेलबद्दल अफवा पसरवणाऱ्यांची कानउघडणी केली आहे.

आणखी वाचा – स्वॅग, स्टाईल अन्…; प्रसाद खांडेकरच्या लेकाचा शाहरुख खानच्या गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ तुफान व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Supriya Pathare (@supriya_pathare75)

सुप्रिया पाठारे यांनी एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “तुम्हा सगळ्यांना माहित आहे आपलं ‘महाराज’ हॉटेल केवडा सर्कल, रामजी हॉटेल समोर ठाणे येथे आहे. या हॉटेलमध्ये पावभाजी स्पेशल मिळते. तुम्ही सगळ्यांनी येऊन आस्वादही घेतला आहे हे आम्हा सर्वांनाच माहित आहे. बऱ्याचश्या गोष्टी आमच्या कानावर आल्या, फोनही आले की, त्यांना असं कळलं हे हॉटेल बंद झालं आहे, बऱ्याच जणांना असं सांगण्यात आलं. पण असं काहीच नाही आहे. २१ तारखेला माझी आई गेली. त्यामुळे आम्ही हॉटेल बंद ठेवलं होत. आता काल तिचं कार्य झालं. आणि त्यातून जरा मोकळे होत, व्यवसाय आहे तो सुरूच ठेवायला हवा म्हणून आजपासून हे हॉटेल खवय्यांसाठी सुरु करतोय. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, महाराज हॉटेलला नक्की येऊन पावभाजीचा आस्वाद घ्या.”

आणखी वाचा – “प्रतिष्ठा, आदर गमावला अन्…”, नावाजलेल्या विमान कंपनीवर भडकला जितेंद्र जोशी, म्हणाला, “प्रवाशांची माफी…”

त्यांचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. बऱ्याच कलाकारांनीही त्यांचा हा व्हिडीओ इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी हा व्हिडीओ शेअर करत, “नक्की आस्वाद घ्या! अफवांवर विश्वास ठेवू नका!” असं म्हटलं आहे.

Tags: entertainmentmarathi actressmarathi serialsupriya pathare
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
Next Post
Prasad Oak On Mahaparinirvan

"४० दिवसांचा अवघड, खडतर प्रवास…", 'महापरिनिर्वाण' चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण होताच प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत, म्हणाला, "कष्टाचं कौतुक…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.