शुक्रवार, मे 23, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : सुकन्या मोनेंनी हातावर काढला टॅटू, नेमका अर्थ काय?, लेकीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 19, 2023 | 5:35 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
marathi actress sukanya mone recently got new tattoo posted on instagram story

Video : सुकन्या मोनेंनी हातावर काढला टॅटू, नेमका अर्थ काय?, लेकीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

अभिनेत्री सुकन्या मोने या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा या चित्रपटांमुळे चांगल्याच प्रसिद्धीझोतात आल्या आहेत. या चित्रपटाला मिळालेल्या  यशामुळे चित्रपटातील कलाकारदेखील चांगलेच लोकप्रिय झाले. अशातच नुकत्याच या चित्रपटाचा खास स्क्रीनिंग सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला त्यांची नव्वद वर्षीय आईदेखील उपस्थित राहिली होती. त्यामुळे सुकन्या मोने यांचं आनंद गगनात मावत नव्हता. सुकन्या मोने सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. त्यामुळे सुकन्या मोने व त्यांची आई या माय-लेकीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. (Sukanya Mone On Instagram)

अशातच सुकन्या मोने यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. सुकन्या मोने यांच्या लेकीने तिच्या हातावर आईच्या आठवणीत खास टॅटू काढला आहे. त्यांची लेक ज्युलियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सुकन्या मोने यांना टॅग करत टॅटू काढतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. “आईबरोबर काढलेला शेवटचा टॅटू” असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तर सुकन्या मोने यांनीही या व्हिडीओखाली “आयुष्यभर लक्षात राहील अशी आठवण” असं म्हटलं आहे. दरम्यान सुकन्या यांनीही त्यांच्या हातावर अगदी लेकीसारखाच टॅटू काढला आहे. त्यांच्या या कृतीमुळे त्यांच्यातील मायलेकीचे गोड नाते दिसून येते.   

आणखी वाचा – येत्या नवीन वर्षात ओटीटीवर मनोरंजनाची पर्वणी, ‘मिर्झापूर’, ‘पंचायत’सारख्या बहूचर्चित सिरीजचे नवीन सीझन येणार

मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकार जोड्यांपैकी एक लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेते संजय मोने व सुकन्या मोने. गेली अनेक वर्षे ही जोडी मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. आजवर त्यांनी अनेक नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सुकन्या यांच्या करिअरचा प्रवास शाळा व महाविद्यालयापासूनच सुरु झाला.’प्रेमासाठी वाट्टेल ते’ या मराठी चित्रपटामधून त्यांनी सिनेक्षेत्रामध्ये पदार्पण केले.

आणखी वाचा – स्वानंदी टिकेकरची लग्नाची जोरदार तयारी, होणाऱ्या नवऱ्याने खास फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद, म्हणाला, “सहा दिवस…”

सुकन्या यांनी आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘आभाळमाया’, ‘वादळवाट’, ‘कळत नकळत’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘चुक भूल द्यावी घ्यावी’, ‘जुळून येती रेशीमगाठी’ यांसारख्या अनेक दर्जेदार व लोकप्रिय मालिकांच्या त्या महत्त्वपूर्ण भाग होत्या. त्यांच्या या मालिकांमधील अभिनय आजही लोकांच्या स्मरणात आहे.

Tags: entertainment newsmarathi actressmarathi entertainmentMarathi newssukanya monesukanya mone daughter
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Salman Khan
Entertainment

घरापर्यंत पोहोचली, दरवाजाची बेलही वाजवली अन्…; ‘त्या’ महिलेचा सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न, घडलं असं की…

मे 23, 2025 | 3:46 pm
dowry death in pune
Social

बापाला शेवटचा फोन अन् लेकीने संपवलं आयुष्य, पुण्यात हुंड्यामुळे आणखी एक बळी, लग्नाच्या एका महिन्यातच…

मे 23, 2025 | 3:35 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

“हुंड्याच्या पैशांतून उभारलेली घरंदारं…”, वैष्णवी हगवणे प्रकरणी मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत, म्हणाले, “असा छळ…”

मे 23, 2025 | 12:51 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

“प्रकरण दाबलं तर पुन्हा पैसा व पद…”, वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं बेधडक वक्तव्य, म्हणाली, “आरोपींना…”

मे 23, 2025 | 12:35 pm
Next Post
Dilip Joshi Son Wedding

'तारक मेहता…' मधील जेठालालच्या लेकाच्या लग्नाची चर्चा, सूनही आहे कलाकार, पाहा खास फोटो

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.