०२४ या वर्षाला निरोप देऊन सर्वांनी मोठ्या जल्लोषात २०२५ या नवीन वर्षाचे स्वागत केले आहे. २०२५ या नवीन वर्षात प्रत्येकाची काही स्वप्ने असणार आहेत आणि प्रत्येक जण त्या स्वप्नपूर्तीसाठी मेहनत घेणार आहे. पण या नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावरच एका मराठी अभिनेत्रीची स्वप्नपूर्ती झाली आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. मराठीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांना भुरळ घालणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतीच एक नवीन महागडी कार खरेदी केली आहे. अभिनेत्रीने गाडी खरेदी करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Sonali Kulkarni New Car)
सोनालीने एका नामांकित कंपनीची महागडी कार खरेदी केली आहे आणि ही नवीन कार खरेदी करतानाचे काही खास क्षण तिने आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. सोनालीने शोरुममध्ये आपल्या कुटुंबीयांसह नव्या गाडीची पूजा केली. यावेळी अभिनेत्रीचं स्वागत करण्यासाठी सुंदर सजावट देखील करण्यात आली होती. फुग्यांची सजावट, अभिनेत्रीचे पोस्टर्स आणि फटाक्यांनी सोनालीचे अभिनंदन करण्यात आल्याचंही या फोटोमधून पाहायला मिळत आहे.
२०२४ मध्ये ऑगस्ट महिन्यात या नवीन कारचं एडिशन भारतात लॉन्च करण्यात आलं होतं. तसंच या महागड्या गाडीची किंमत ७३ ते ७४ लाख असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवात सोनालीने अगदी दणक्यात केली आहे. तिच्या या नवीन कारनिमित्त मराठी विश्वातून तिच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षावही होत आहे. अक्षय केळकर, वैदही परशुरामी तसेच इतर अनेक मराठी कलाकारांनी सोनालीच्या या नवीन कार खरेदीच्या फोटोखाली कमेंट्स केल्या आहेत आणि तिचं अभिनंदन केलं आहे.
दरम्यान, सोनालीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, नुकतीच ती ‘मानवत मर्डर्स’ या थ्रिलर सीरिजमध्ये झळकली होती. या सीरिजचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. या सीरिज मध्ये अनेक इतर मराठी कलाकारही आहेत. या सीरिज मध्ये सोनालीच्या सोनालीने साकारलेल्या रुक्मिणी या भूमिकेला चांगलीच प्रेक्षक पसंती मिळाली. तिच्यासह या सीरिज मध्ये सई ताम्हणकर, मकरंद अनासपुरे, आशुतोष गोवारीकर हे कलाकारही आहेत.