Ileana DCruz Pregnancy : बॉलिवूड सेलिब्रिटी नवीन वर्ष मोठ्या थाटामाटात साजरे करताना दिसले. अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियावर त्यांच्या सेलिब्रेशनची खास झलक दाखवत आहेत. अभिनेत्री इलियाना डिक्रूझनेही चाहत्यांना २०२४ या वर्षाची झलक दाखवली आहे. अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिने चाहत्यांना गेल्या वर्षातील जानेवारी ते डिसेंबरपर्यंतची झलक दाखवली आहे. तिने या व्हिडीओमध्ये असं काहीतरी शेअर केले आहे ज्यानंतर तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना वाटत आहे की, अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार आहे.
इलियानाने जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तिच्या काही खास फोटोंची झलक दाखवली आहे. यामधील अभिनेत्रीच्या ऑक्टोबर महिन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्हिडीओमध्ये इलियाना भावूक होऊन कॅमेऱ्याकडे प्रेग्नेंसी किट टेस्ट करताना दिसत आहे. त्यानंतर सोशल मीडियावर चाहते तिच्या प्रेग्नेंसीबद्दल बोलत आहेत. व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले आहे की, “प्रेम. शांतता. दया. हे सर्व होईल आणि २०२५ मध्ये आणखी चांगलं होईल अशी अपेक्षा आहे”.
इलियानाच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर एकाने लिहिले आहे की, “थांबा. ऑक्टोबर, पुन्हा अभिनंदन”. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “तू पुन्हा गरोदर आहेस का?”. तर एका चाहत्याने लिहिले आहे की, “२०२५ मध्ये दुसरे बाळ येणार आहे? आणि आमचा गैरसमज झाला?”. इलियानाची ही पोस्ट लोकांना खूप आवडली आहे.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा ‘कार’नामा, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घेतली महागडी आलिशान कार, फोटो व्हायरल
इलियाना डिक्रूझने मायकल डोलनशी लग्न केले आहे. या जोडप्याने ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले आणि त्याचे नाव कोआ ठेवले. यावर्षी, त्यांनी कोआचा पहिला वाढदिवस साजरा केला कारण इलियानाने इंस्टाग्रामवर हृदयस्पर्शी फोटो शेअर केले. या फोटोंना लोक खूप पसंत करत आहेत.