मराठी सिनेसृष्टीतील काही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सोनाली कुलकर्णी. लाडकी अप्सरा म्हणत सोनालीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. निरागस अभिनय, उत्तम नृत्यकौशल्य व सौंदर्याने सोनालीने मराठीसह हिंदी प्रेक्षकांनादेखील भुरळ घातली आहे. सोनाली सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आपल्या विविधांगी भूमिकांसाठी लोकप्रिय असलेली सोनाली तिच्या रोखठोक भूमिकांसाठीही तितकीच प्रसिद्ध आहे. शिवाय ती तितक्याच तीव्रतेने सोशल मीडियावर नेटकऱ्यांना उत्तरही देत असते. (Sonalee Kulkarni Troll)
ट्रेंडींगनुसारही सोनाली नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. यामध्ये ती अनेकदा सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अनेकदा सोनाली ट्रेंडिंग रीलवर काही ना काही शेअर करताना दिसते. अशातच सोनालीने ही एक ट्रेंडिंग रील शेअर केला आहे. या तिच्या रील व्हिडीओमध्ये तिने फॅशन केलेली पाहायला मिळत आहे.
अभिनेत्रीच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दर्शविली आहे. असं असलं तरी या व्हिडीओवरही तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. व्हिडीओमध्ये सोनाली तिचं शर्ट उघडून नेकलेस दाखवत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ पाहून एका नेटकऱ्याने केलेली कमेंट लक्षवेधी ठरत आहे. नेटकऱ्याच्या या कमेंटवर सोनालीने ही प्रतिउत्तर दिलेलं पाहायला मिळत आहे. सोनालीच्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट “काय दाखवू इच्छिता”, असं विचारलं आहे. यावर सोनालीने कमेंट करत त्या नेटकऱ्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. सोनालीने या प्रश्नावर उत्तर देत असं म्हटलं आहे की, “नेकलेस भाईसाहेब. तुम्हाला काय वाटलं”, असं उत्तर सोनालीने दिलं आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी सिनेसृष्टीत प्रचंड सक्रिय आहे. लवकरच ती ‘मलैकोट्टाई वालिबान’ या चित्रपटातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. अभिनयाव्यतिरिक्त ती सोशल मीडियावर सक्रिय असून ती तिचे फोटोज व व्हिडीओ शेअर करत असते.