शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Ott : ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात ‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोड, शोमधील लाइव्ह कॉन्सर्टमध्ये थिरकले स्पर्धक, व्हिडीओ तुफान व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 1, 2024 | 2:15 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
bigg boss marathi season 3 gulabi sadi song

'बिग बॉस ओटीटी ३'च्या घरात लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान संजू राठोडच्या गुलाबी साडीची हवा, स्पर्धकही बेभान होऊन थिरकले

Bigg Boss Ott Season 3 Update : ‘बिग बॉस’ हा टीव्हीवरील वादग्रस्त शोपैकी एक असला तरी हा शो सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ हा शो कंटेटसाठी जितका ओळखला जातो, तितकाच तो घरातील स्पर्धकांसाठीही ओळखला जातो. ‘बिग बॉस ओटीटी’ जेव्हापासून सुरु झाला तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या वादामुळे तो चर्चेत राहिला.
अभिनेते अनिल कपूर हा ‘बिग बॉस ओटीटी’चा शो होस्ट करताना दिसत आहेत. उद्या म्हणजेच २ ऑगस्ट रोजी ‘बिग बॉस ओटीटी’चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. काही महिन्यांपासून हा शो चर्चेत असलेला पाहायला मिळाला.

२ ऑगस्टला ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहेत. तर या पर्वाच्या शेवटच्या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रियेत अरमान मलिक, लवकेश कटारिया हे दोन सदस्य स्पर्धेतून बाद झाले. त्यामुळे आता रणवीर शौरी, सना मकबुल, नेझी, कृतिका मलिक, साई केतन या टॉप पाच सदस्यातून ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या ट्रॉफीवर कोणता स्पर्धक नाव कोरणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहील आहे.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : आदित्य मरणाच्या दारात, पारू व अहिल्यादेवींची त्याला वाचवण्यासाठी अग्निपरीक्षा, मंगळसूत्रही काढून ठेवलं अन्…

View this post on Instagram

A post shared by Gola_ka_News (@gola_ka_news)

महाअंतिम सोहळा होण्यापूर्वी ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात स्पर्धकांसाठी लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलं आहे. आणि या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये मराठमोळ्या गायक व रॅपरची धमाल पाहायला मिळाली. संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना गुलाबी साडी या गाण्याने भुरळ घातली. संजू राठोडच्या गुलाबी साडीची हवा सर्वत्र पसरलेली पाहायला मिळत आहे. अशातच यंदाच्या ‘बिग बॉस ओटीटी’च्या या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये ‘गुलाबी साडी’ने साऱ्या स्पर्धकांना थिरकायला भाग पाडलं.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “मोठमोठ्या संकटांना हरवून इथे आलास आणि…”, सूरज चव्हाण मराठी इंडस्ट्रीमधून फुल्ल सपोर्ट, अभिनेता म्हणाला, “शिकलेल्या माणसांना…”

‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात होणाऱ्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये मीट ब्रोस, शिबानी कश्यप, निकिता, नकाश अझीझ आणि मराठमोळा गायक संजू राठोडचा परफॉर्मन्स होणार आहे. यावेळी संजू राठोड त्याची सुपरहिट झालेली मराठी गाणी परफॉर्म करणार आहे. यावेळी गुलाबी साडीच्या परफॉर्म्सनने साऱ्यांना भुरळ घातली. संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’, ‘नऊवारी पाहिजे’ या गाण्यांवर ‘बिग बॉस ओटीटी’चे स्पर्धक थिरकताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Update Chota Pudhari aka Ghanshyam Darwade know more

Bigg Boss Marathi : शेतकरी कुटुंब, परिस्थिती बेताची, आई-वडिलांना एकुलता एक अन्…; घन:श्यामचं खरं आयुष्य नेमकं कसं?, इतकी प्रसिद्धी कशामुळे मिळाली?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.