गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“गरीबांचा इमरान हाश्मी”, अक्षरा-अधिपतीचा हनिमून व्हिडीओ पाहून भडकले प्रेक्षक, म्हणाले, “हे घरात टीव्हीवर बघताना…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 2, 2024 | 1:13 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada zee marathi serial audience displeasure on new promo

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षकांची नाराजी

Tula Shikvin Changlach Dhada : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिका सध्या रोमॅंटिक वळणावर आली आहे. मालिकेत अधिपती व अक्षरा यांच्या हनिमूनचा सिक्वेन्स पाहायला मिळत आहे. हनिमूनसाठी अधिपती व अक्षरा हे थायलंडमध्ये गेले होते आणि याचे काही खास क्षण आता मालिकेत बघायला मिळत आहेत. मालिकेत आता हनिमून स्पेशल भाग पाहायला मिळणार असून अधिपती-अक्षरा यांचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे. या हनिमून स्पेशल भागांचे नवीन प्रोमो सोशल मीडिया अकाऊंटवर पाहायला मिळत असून या नवीन प्रोमोला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. मालिकेचे रोमॅंटिक प्रोमो सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून या प्रोमोंना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. (Tula Shikvin Changlach Dhada New Promo)

अशातच या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यात अधिपती व अक्षरा एकमेकांच्या प्रेमात अगदी आकंठ बुडाले आहेत. ‘जोगवा’ चित्रपटातील ‘जीव रंगला’ या गाण्यावर या दोघांचा रोमान्स पाहायला मिळत आहे. या नावीन प्रोमोसाठी अधिपती-अक्षरा यांनी खासस लूकही केला आहे. अक्षराने लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. तर अधिपतीने पांढऱ्या रंगाचे शर्ट-पॅंट घातली आहे. प्रेमाला समर्पित असलेल्या लाल व पांढऱ्या रंगावर या दोघांचा खास प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “मोठमोठ्या संकटांना हरवून इथे आलास आणि…”, सूरज चव्हाण मराठी इंडस्ट्रीमधून फुल्ल सपोर्ट, अभिनेता म्हणाला, “शिकलेल्या माणसांना…”

हा नवीन प्रोमो काहींना आवडला आहे. मात्र काहींच्या हे पसंतीस पडला नाही.  ‘तुला शिकवीन…’चा  नवीन प्रोमो प्रेक्षकांना आवडला नसून अनेकांनी याबद्दल त्यांची मतं कमेंट्सद्वारे व्यक्त केली आहेत. या नवीन प्रोमोवर एका नेटकऱ्याने “यांना आवरा, ही मालिका आहे चित्रपट नाही” असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने “हा इम्रान हाश्मीचा चित्रपट आहे का?” तसंच “गरिबांचा इमरान हाश्मी” असं म्हटलं आहे. तसेच एकाने “ही मालिका घरी टीव्हीवर बघताना बंद करावी लागली, खूप आवडती मालिका होती” तर आणखी एकाने “जरा अतिच दाखवत आहेत. अति तेथे माती हे ध्यानात ठेवा म्हणजे झालं” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : शेतकरी कुटुंब, परिस्थिती बेताची, आई-वडिलांना एकुलता एक अन्…; घन:श्यामचं खरं आयुष्य नेमकं कसं?, इतकी प्रसिद्धी कशामुळे मिळाली?

दरम्यान, झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री शिवानी रांगोळे व अभिनेता ऋषिकेश शेलार ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. अधिपती हा श्रीमंत घरचा मुलगा आहे, तर अक्षरा ही एका शाळेतील शिक्षिका आहे. मालिकेत अक्षरा-अधिपती यांच्या नवीन केमिस्ट्रीला सुरुवात झाली असून हे केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे.

Tags: marathi entertainment newsMarathi Serial Newstula shikvin changlach dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Garbage Collector Passed 10th Exam
Women

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

मे 15, 2025 | 2:00 pm
Next Post
sankarshan karhade post viral

बाईंसाठी संकर्षण कऱ्हाडेने लिहिलेल्या पोस्टमध्ये नेटकऱ्याने काढल्या चुका, अभिनेता म्हणाला, "बक्षीस पोस्टसाठी नाही तर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.