शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सायली व अर्जुनमध्ये दुरावा?, प्रेमाची कबुली न देताच दोघांत गैरसमज अन्…; मालिकेत नवा ट्विस्ट

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 8, 2024 | 5:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharal Tar Mag Promo

सायली व अर्जुनमध्ये दुरावा?, प्रेमाची कबुली न देताच दोघांत गैरसमज अन्…; मालिकेत नवा ट्विस्ट

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत. मालिकेत येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेतील सायली व अर्जुनची जोडी तर प्रेक्षकांची आवडती जोडी झाली आहे. सध्या मालिकेत सायली व अर्जुनचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. तर एकीकडे सायली ही अर्जुनच्या प्रेमात आकंठ बुडाली असल्याचं पाहायला मिळतं. मालिकेत सध्या सायलीने प्रेमाची कबुली दिलेली पाहायला मिळतं आहे. त्यामुळे अर्जुन व सायलीच्या नात्याला कलाटणी मिळणार असल्याचं चित्र दिसत आहे. (Tharal Tar Mag Promo)

मालिकेत प्रियाने साक्षीच्या सांगण्यावरुन अर्जुन व सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य पूर्णा आजीला सांगितलेलं असतं. मात्र सायली देवासमोर शपथ घेत अर्जुनवरील प्रेमाची कबुली देत प्रियाला खोटं ठरविते. तर सायलीने सुभेदार कुटुंबासमोर प्रेमाची कबुली दिली असल्याने अर्जुन मनोमनी खूप खुश असतो. मात्र दोघांनी एकमेकांसमोर कबुली दिलेली नसते. आता लवकरच दोघंही एकत्र येणार आणि त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे हे कबूल करणार, असं वाटत असतानाच सायली व अर्जुनमध्ये दुरावा येणार असल्याचं एका प्रोमोमधून समोर आलं आहे.

आणखी वाचा – ‘Respect ही मोठी गोष्ट असते”, हास्यजत्रा सोडण्यावरून सुनावणाऱ्यांना गौरव मोरेचं सडेतोड उत्तर, म्हणाला, “शो का सोडला याचा विचार…”

View this post on Instagram

A post shared by ❣️Sayali_arjun_star❣️ (@sayali_arjun_star)

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, सायली व कुसुम बऱ्याच दिवसांनी एकमेकांना भेटतात. त्यावेळी सायली कुसुमला सगळं काही मनातील सांगते. सायलीचं अर्जुनवर प्रेम आहे; पण अर्जुनचं तिच्यावर प्रेम नाही. असा सायलीचा गैरसमज होतो. मनातील सर्व भावना सायली कुसुमला सांगते. आणि ती रडू लागते. सायली कुसुमला म्हणते, “माझ्याही नकळत मी अर्जुन सरांच्या प्रेमात पडले; पण सरांच्या मनात माझ्याविषयी काहीही नाही”.

आणखी वाचा – आतापर्यंत ‘या’ सुप्रसिद्ध कलाकारांचा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून काढता पाय, पण यामागचं नेमकं कारण काय?, प्रेक्षकही नाराज

अर्जुनबाबतच्या गैरसमजामुळे सायलीच्या भावना दुखावल्या जातात. तर दुसरीकडे अर्जुन त्याच्या कारमध्ये बसून मोबाईलमधे सायलीचा फोटो पाहत रडत असतो. तेव्हा अर्जुन असं म्हणताना दिसतो की, “मला तुम्हाला घेऊन माझी बायको म्हणून मिरवायचं होतं. पण तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीही नाही, हे माझ्या आधीच लक्षात यायला पाहिजे होतं”. असं म्हणत तो सायलीचा फोटो मिठीत घेतो. अर्जुन व सायली यांनी एकमेकांवरील प्रेम लपवून ठेवल्याने त्यांच्यात खूप मोठे गैरसमज निर्माण झाले आहेत. आता दोघांमधील हे गैरसमज दूर होणार का?, दोघेही एकमेकांना प्रेमाची कबुली देणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: entertainmentmarathi serialstar pravahtharal tar magTharal Tar Mag Promo
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Appi Aamchi Collector marathi serial update new twist

अखेर सात वर्षांनी अर्जुन-अप्पी आले समोरासमोर, अमोल आपला मुलगा असल्याचं सत्य अर्जुनसमोर येणार का?, पुढे काय घडणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.