बुधवार, एप्रिल 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अखेर सात वर्षांनी अर्जुन-अप्पी आले समोरासमोर, अमोल आपला मुलगा असल्याचं सत्य अर्जुनसमोर येणार का?, पुढे काय घडणार?

Saurabh Moreby Saurabh More
मे 8, 2024 | 5:49 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Appi Aamchi Collector marathi serial update new twist

अखेर सात वर्षांनी अर्जुन-अप्पी आले समोरासमोर, अमोल आपला मुलगा असल्याचं सत्य अर्जुनसमोर येणार का?, पुढे काय घडणार?

छोट्या पडद्यावरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत आलेल्या लीपमुळे ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. काही वर्षांचा लीप घेत ही मालिका पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांसमोर आली आहे आणि त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. मालिकेत अप्पी व अर्जुन यांची ताटातूट झालेली पाहायला मिळत आहे. मात्र आता सात वर्षांनंतर अप्पी व अर्जुन पुन्हा एकदा एकमेकांसमोर येणार आहेत.

७ मे रोजी या मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये अप्पी व अर्जुन यांची भेट होतानाचे पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये असं पहायला मिळत आहे की, अमोल व अप्पी फिरायला जातात तेव्हा अमोलची टोपी खाल पडते. ती आणायला अप्पी खाली येते. टोपी उचलल्यानंतर अप्पीचा तोल जातो आणि ती खाली पडणार तेव्हा अर्जुन तिला पकडतो आणि तिला आधार देतो. 

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

अशातच मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे. यामध्ये अमोल आपला मुलगा असल्याचं सत्य अर्जुनसमोर येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. यात अप्पी तिच्या बाबांना असं म्हणते की, “बापू मला अर्जुन भेटला होता. अमोलला मी सांभाळलं आहे. त्यामुळे आत्ता त्याच्यावर तुझा काहीही हक्क नाही असं म्हणत मी त्याला स्पष्ट नकार दिला.

आणखी वाचा – ‘Respect ही मोठी गोष्ट असते”, हास्यजत्रा सोडण्यावरून सुनावणाऱ्यांना गौरव मोरेचं सडेतोड उत्तर, म्हणाला, “शो का सोडला याचा विचार…”

तर या व्हिडीओत अर्जुनलाही अमोल त्याचाच मुलगा असल्याबद्दल खात्री वाटत आहे. “सिंबा माझा तर मुलगा नाही ना?” असा विचार करत त्याला अमोलबरोबरचे काही खास क्षण आठवत आहेत. त्यामुळे अर्जुनची खात्री व्हावी म्हणून तो अमोलला अप्पीबरोबर बघण्याचा विचार करतो. उद्या सिंबाला सोडायला अप्पी येते का बघू? असा विचार करत आहे.

आणखी वाचा – अप्पी-अर्जुन एकत्र येण्यासाठी अमोलचं छत्रपती शिवाजी महाराजांना गाऱ्हाणं, हातही जोडले, एकत्र येणार का?

त्यामुळे आता सिंबा म्हणजेच अमोलचं सत्य अर्जुनसमोर येणार का? अप्पी अमोल व अर्जुनची भेट घडवून आणणार का? अप्पी-अर्जुन पुन्हा एकत्र येणार का? त्यांच्यात अमोलमुळे पुन्हा पूर्वीसारखे नाते निर्माण होणार का?  हे पाहण्यासाठी मालिकेचे प्रेक्षक चांगलेच आतुर आहेत. मालिकेत पुढे काय होणारहे पाहण्यासाठी त्यांची उत्सुकता लागून राहिली आहे.                

Tags: appi aamchi collectormarathi entertainment newsMarathi Serial News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Digamber Naik Statement
Entertainment

“केदार शिंदे मिठी मारणार पण…”, इंडस्ट्रीत काम न देण्यावरुन दिगंबर नाईक स्पष्टच बोलले, म्हणाले, “फरक नाही पडत…”

एप्रिल 8, 2026 | 4:24 pm
Ghabadkund Marathi Movie
Entertainment

मराठीत पहिल्यांदाच ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’; प्रितम पाटील सेट करणार नवा ट्रेंड, इमोशन, ड्रामा आणि…

एप्रिल 8, 2026 | 3:00 pm
south actress subhashini found dead 
Entertainment

मृत्यूपूर्वी नवऱ्याचा व्हिडीओ कॉल, भांडणही झालं आणि…; प्रसिद्ध अभिनेत्रीचा घरातंच सापडला मृतदेह, दोन वर्षांपूर्वी झालेलं लग्न

एप्रिल 8, 2026 | 1:25 pm
Deepika Padukone Gave A Fitting Reply Trolls
Entertainment

‘धुरंधर २’च्या यशावर दीपिका पदुकोणचे मौन का?, नेटकऱ्यांचा सवाल, उत्तर देत म्हणाली, “तुमच्यापैकी कुणीही…”

एप्रिल 8, 2026 | 12:25 pm
Next Post
ranveer singh instagram photo

रणवीर सिंह व दीपिका पदुकोण यांच्यामध्ये वाद? फोटो डिलिट करण्यावरुन रणवीरच्या टीमचे स्पष्टीकरण, म्हणाले, “ते फोटो...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.