शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा लग्नबंधनात, साधेपणाने केला विवाह, व्हिडीओ व फोटो व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 10, 2024 | 12:24 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi actress Sneha Chavan got married for the second time and she shared the photos and videos on social media

मराठी अभिनेत्री स्नेहा चव्हाण पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकली, फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

‘ऊन पाऊस’, ‘कळत नकळत’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे अनिकेत विश्वासराव. मालिकांसह ‘पोश्टर बॉईज’, ‘पोश्टर गर्ल’, ‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावरही अनिकेतने त्याच्या अभिनयाची छाप सोडली. पण काही वर्षांपूर्वी अनिकेत त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे फार चर्चेत आला होता. अनिकेतने २०१८ मध्ये अभिनेत्री स्नेहा चव्हाणबरोबर लग्नगाठ बांधली होती. पण त्यांचा हा संसार फक्त दोनच वर्ष टिकला. अवघ्या दोन वर्षांतच दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. याचदरम्यान स्नेहा पुण्यात आपल्या आईकडे राहत होती. (Sneha Chavan Second Marriage)

घटस्फोटानंतर अभिनेत्रीने पुन्हा एकदा आपलं आयुष्य नव्याने जगायला सुरुवात केली आहे. नुकतीच तिने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. स्नेहाने काल तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे तिच्या हाताला मेहंदी लावल्याचे फोटो शेअर केले होते. त्याचबरोबर तिच्या मित्रमंडळींनीही आपल्या हाताला मेहंदी लावली असल्याचे काही फोटो शेअर केले होते. तसंच तिला तिच्या अनेक मित्र-मैत्रीणींनी शुभेच्छाही दिल्या होत्या. “हे होतंय याची वाट पाहू शकत नाही”, “प्रेम आणि खूप शुभेच्छा” असं म्हणत अनेकांनी फोटो व व्हिडीओ शेअर केले होते.

आणखी वाचा – “म्हणून ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झालो नाही”, सुप्रसिद्ध अभिनेत्याचे शोमध्ये न येण्याबद्दलचे विधान चर्चेत, म्हणाला, “खूप कमीपणा…”

अशातच अभिनेत्रीने आज काही इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केल्या आहेत, ज्यावरुन स्नेहाने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीला तिच्या मित्रपरिवाराने लग्नानिमित्त शुभेच्छा दिल्या असून या स्टोरी स्नेहाने री-शेअर केल्या आहेत आणि या स्टोरीवरुन तिने दुसऱ्यांदा लग्न केल्याचे कळत आहे. या खास लग्नसोहळ्यासाठी अभिनेत्रीने खास भरजरी असा गाऊन परिधान केला होता आणि ती या लूकमध्ये फारच सुंदर दिसत होती.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचे वृद्धापकाळाने निधन, वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कुटुंबियांना दु:ख अनावर

दरम्यान, अनिकेत विश्वासरावबरोबरच्या घटस्फोटानंतर अभिनेत्री स्नेहा चव्हाणने पुन्हा एकदा आपलं आयुष्य नव्याने जगायला सुरुवात केली आहे. या संपूर्ण प्रवासात तिला तिच्या कुटुंबीयांनी मोठी साथ दिली. आता तिच्या आयुष्यात तिचा नवीन जोडीदारही आला आहे. त्यामुळे स्नेहा आता पुन्हा एकदा आपलं आयुष्य नव्याने जगणार असून यात तिला तिच्या जोडीदाराचीही उत्तम साथ मिळेल. अभिनेत्री सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

Tags: marathi actresssneha chavanSneha Chavan Second Marriage
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
Bigg Boss Marathi 5 fame Chhota Pudari aka Ghanshyam Darwade came to Mumbai and met Nikki Tamboli and Arbaaz Patel video shared on Instagram

Bigg Boss Marathi फेम छोटा पुढारीने थेट मुंबई गाठत घेतली निक्की-अरबाजची भेट, दोघांनी घन:श्यामला दिलं ‘हे’ आश्वासन, म्हणाले...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.