बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हॉस्पिटलमध्येही माझी मालिका पाहायच्या”, वीणा देव यांच्या निधनावर नातसून शिवानी रांगोळे भावुक, म्हणाली, “त्यांच्या आठवणी…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 31, 2024 | 9:15 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actress Shivani Rangole shared an emotional post on Dr. Veena Deo death

सुप्रसिद्ध लेखिका, समीक्षक तसेच अभिजात साहित्य लीलया हाताळणाऱ्या डॉ. वीणा देव यांचं अल्पशा आजाराने मंगळवारी (२९ ऑक्टोबर) निधन झालं. त्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आई, तर लेखक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत्या. वीणा देव यांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर संपूर्ण साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. आईच्या निधनानंतर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी दु:ख व्यक्त करत भावुक पोस्ट शेअर केली. तिची उणीव जरी भासली तरी, तिने जोडलेल्या मोठ्या मित्रपरिवाराच्या आणि तिने लिहिलेल्या अनमोल कलाकृतींच्या रूपाने तिची सोबत कायम असेल. आशीर्वाद असावा!” असं लिहित मृणाल कुलकर्णी यांनी आईच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. (Shivani Rangole on Veena Deo Death)

अशातच आता मृणाल कुलकर्णी यांची सून म्हणजेच अभिनेत्री शिवानी रांगोळेनेदेखील वीणा देव यांच्याबद्दलची भावुक पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवर शिवानीने वीणा देव यांच्याबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत आणि त्यांच्याबद्दलच्या भावुक आठवणी शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये शिवानीने असं म्हटलं आहे की, “त्या नेहमी म्हणायच्या की आपल्या सवयी सारख्या आहेत. दोघींना सतत थंडी वाजत असायची. म्हणून प्रवासात मोजे सोबत ठेवायची सवय, फुलांची आणि फुलं असणाऱ्या कपड्यांची प्रचंड आवड, पुस्तकांची प्रचंड आवड, दुपारची विश्रांती प्रिय”.

View this post on Instagram

A post shared by Shivani Rangole Kulkarni (@rangshivani)

आणखी वाचा – 31 october Horoscope : दिवाळीचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा असेल? हा शुभदिवस आयुष्यात नक्की काय घेऊन येईल? जाणून घ्या…

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “बाहेर जेवायला गेलो तर शेअरिंगसाठी नेहमी आमचा एक गट व्हायचा. मला शूटिंग करताना कुठलाही मराठी शब्द अडला तर मी हक्कानी कधीही फोन करायचे आणि त्या ही आनंदाने मला शिकवायच्या. मध्यंतरी कागदावर कविता लिहून मला पाठवायच्या. माझी मालिका अगदी हॉस्पिटलमध्ये सुद्धा न चुकता पाहायच्या. माझा आवाज बैलाच्या गळ्यातल्या घुंगरासारखा आहे असं विराजसला म्हणायच्या. गमतीशीर किस्से सांगताना त्यांच्या डोळ्यांत चमक यायची. गो.नी. दांचं भ्रमणगाथा वाचताना मी भारावून जाऊन फोन, मॅसेज करायचे तेव्हा त्यांना खूप आनंद व्हायचा.

आणखी वाचा – अमोलच्या आजारपणाचे नेमके कारण आले समोर, अप्पी-अर्जुनला कळलं सत्य, तिघांच्या आयुष्यात काय बदल होणार?

यापुढे शिवानीने त्यांच्याबद्दल असं म्हटलं आहे की, “हा वारसा जपायचा आहे तुम्ही असं प्रेमानी सांगायच्या. त्यांच्यातला शांतपणा, सात्विक भाव आणि विचारांची श्रीमंती मृणाल ताई, मधुरा मावशी, विराजस आणि राधा मध्ये पुरेपूर जाणवते. त्यांचा कठीण काळ विसरून, फक्त आणि फक्त त्यांच्या ह्याच हसऱ्या आठवणी सोबत घेऊन आता जगायचे आहे. त्या बघत आहेत, त्यांना कौतुक आहे म्हणून काम करण्याचा हुरूप यायचा आणि इथून पुढेही येईल”. दरम्यान, या पोस्टखाली अनेकांनी वीणा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Tags: marathi actressshivani rangoleShivani Rangole on Veena Deo Death
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Navri Mile Hitlerla serial fame actress Sharmila Shinde narrated the horrifying story of firecrackers in childhood

…अन् फटाका हातात फुटला, 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीने सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाली, "दहा मिनिटे माझ्या कानातून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.