झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत अमोल हा अप्पी व अर्जुनला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतानाचे पाहायला मिळत होते. त्याचे हे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून अपयशी ठरताना दिसत होते. पण आता अखेर मालिकेत अमोलचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अर्जुनने अप्पी आणि अमोलबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मालिकेत काही दिवस अमोल दोघांना एकत्र आणत होता आणि अमोलला यश मिळाले आहे. अप्पी-अर्जुन दोघे अमोलसाठी एकत्र आले आहेत. त्यांना एकत्र आल्याचे पाहून प्रेक्षकही आनंदी झाले आहेत. (Appi Amchi collector serial update)
अशातच आता मालिकेत एक ट्विस्ट आला आहे. अमोलच्या प्रयत्नानंमुळे अर्जुन-अप्पी एकत्र आले आहेत. पण त्यांना एकत्र आणणारा अमोल आजारी पडला आहे. मालिकेत काही दिवसांपूर्वी त्याला आजार झाल्याचे समोर आले होते. मात्र हा आजार नक्की काय होता? याविषयी कुणालाच काहीच कल्पना नव्हती. अशातच आता त्याच्या आजारपणाचे कारण समोर आले आहे. अमोलला ट्यूमर झाला असून याचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. अप्पी व अर्जुन यांनी लग्नाआधी गेलेल्या ठिकाणी भेट देतात. यावेळी त्यांच्याबरोबर अमोलही असतो.
आणखी वाचा – “पहिली शालिनीच मस्त होती”, ‘सुख म्हणजे…’ फेम माधवी निमकरला प्रेक्षकांच्या कमेंट, म्हणाले, “कमाल अभिनय…”
यावेळी अमोलला अचानक चक्कर येते आणि तो जमिनीवर कोसळतो. त्यानंतर अर्जुन त्याला उचलुन हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. यावेळी डॉक्टर अप्पी व अर्जुन यांना अमोलला मेंदू संबंधित आजार झाल्याचे सांगतात. तसेच यावेळी डॉक्टर अमोलला ट्यूमर झाल्याची शक्यताही सांगतात. अमोलला ट्यूमर झाल्याचे ऐकताच अर्जुन व अप्पीच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. गेल्या अनेक दिवसांपासून अमोलला नक्की काय झालं होतं? हे कळलं नव्हतं. अप्पी व अर्जुनपासून अमोलने हे लपवून ठेवलं होतं. अशातच आता त्याच्या आजारपणाचे कारण समोर आले आहे.
आणखी वाचा – युट्यूबर अरमान मलिक पाचव्यांदा वडील होणार, गरोदर आहे पायल, कृतिकानेच केला खुलासा
अमोलच्या आजारपणाचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला असून या प्रोमोखाली प्रेक्षकांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, अमोलच्या आजारपणामुळे आता मालिकेला काय नवीन वळण येणार? अमोलच्या आजारपणामुळे अप्पी व अर्जुन यांच्या नात्यावर काय परिणाम होणार? हे पाहणे रंजक होणार आहे. त्यामुळे आता आगामी भागांसाठी प्रेक्षक उत्सुक असतील हे नक्कीच…