शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझे अंतर्वस्त्र दिसावे म्हणून त्यांनी…”, मराठी मालिकेमध्ये काम करण्यावरुन सविता मालपेकरांचा धक्कादायक खुलासा, म्हणाल्या, “इतका त्रास दिला की…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 1, 2024 | 9:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Savita Malpekar Shared Casting Couch Incident

"माझे अंतर्वस्त्र दिसावे म्हणून त्यांनी...", मराठी मालिकेमध्ये काम करण्यावरुन सविता मालपेकरांचा धक्कादायक खुलासा, म्हणाल्या, "इतका त्रास दिला की..."

बॉलिवूडमधील कलाकारचं कास्टिंग काऊचची शिकार होतात असं नाही. अनेक मराठी कलाकारांनाही याचा प्रत्यक्ष अनुभव आला आहे. बरेचदा या कलाकार मंडळींनी त्यांना आलेले अनुभव चाहत्यांसह शेअर केले आहेत. तर काहींनी कास्टिंग काऊचचे अनुभव कोणाला न सांगता त्याकडे दुर्लक्ष केला आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सविता मालपेकर यादेखील कास्टिंग काऊचची शिकार झाल्या होत्या. त्यांना आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव नुकत्याच दिलेल्या ‘अमृता फिल्म’ या युट्यूब चॅनेलला सांगितला. (Savita Malpekar Shared Casting Couch Incident)

या मुलाखतीदरम्यान बोलताना त्या म्हणाल्या, “‘लक्ष्मी वर्सेस सरस्वती’ या मालिकेदरम्यान हा सर्व प्रकार घडला होता. कोळ्यांवर आधारित असलेल्या या मालिकेत कोळी भाषा शिकण्यासाठी मी विशेष मेहनत घेतली होती. या मालिकेमुळे मला लोकप्रियता मिळाली होती. भूमिकाही हिट झाली होती. पण त्या मालिकेवेळी स्टार प्रवाहच्या हेडने मला खूप त्रास दिला. आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये आजवर मला कुठल्याही चॅनेल हेडने वा निर्मात्यांनी इतका त्रास दिला नव्हता तेव्हढा त्रास मला त्या हेडने दिला होता. सांगायला काही हरकत नाही. मी कोणाला घाबरत नाही. आतमधले अंतर्वस्त्र दिसतील एवढ्या पातळ साड्या मला त्यांनी नेसायला दिल्या. इथपासून त्यांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली. प्रत्येक वेळेला आमच्यामुळे तुम्ही आहात’ असं म्हणत सारखा अपमान करायचे” असंही त्या म्हणाल्या.

आणखी वाचा – “…बाकी सगळ्या मारक्या म्हशी”, गृहप्रवेशादरम्यान प्रथमेश लघाटेचा बायकोसाठी मजेशीर उखाणा, सगळेच पोट धरुन हसू लागले अन्…

पुढे सविता म्हणाल्या, “कुठल्या चॅनेलवर काम करत आहात माहित आहे का? आम्ही आहोत म्हणून वगैरे. पण सुरुवातीला ऐकून घेतलं. किती सहन करणार. एक मर्यादा असते सहन करायची. मी जाडी असल्यामुळे १८ वार साडी नेसायचे. कोळीन मला दररोज साडी नेसवायला यायची. मी महिनाभर नेसवून घेतली, त्यानंतर मी स्वतः शिकले. प्रोडक्शनचे पैसे वाचावेत हा हेतू होता. तेव्हा एका दिवसाचे ती कोळीण ६०० रुपये घ्यायची. म्हणून मी स्वतः शिकले आणि साडी नेसायला लागले. त्यानंतर माझी सहाय्यक अभिनेत्री माझ्या साड्यांचे त्या हेडला फोटो पाठवू लागली. अशाप्रकारे मला त्रास देऊन त्या हेडला काय आनंद मिळत होता, हे आजतागायत कळलं नाही” असं त्या बेधडकपणे म्हणाल्या.

आणखी वाचा – संतोष जुवेकरची आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट, दोघांचा एकत्र फोटो शेअर करत म्हणाला, “तुमच्या संसारासाठी…”

यापुढे त्यांना देण्यात येणारी धमकीबद्दल त्या उघडपणे म्हणाल्या, “मला आव्हान केलं होतं, तुला आम्ही मालिकेतून काढून टाकलं तर कोणी इंडस्ट्रीत घेणार नाही. म्हटलं कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. तुम्ही असं म्हणून मला काम मिळणार नाही, हे तर शक्य होणार नाही. ही २०१३ची घटना आहे, त्यानंतर आज मी कुठे आहे हे सगळेच बघत आहेत” असंही त्या म्हणाल्या.

Tags: marathi actressmarathi malikamarathi moviemarathi serialsavita malpekarsavita malpekar casting couch
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
rishi kapoor wanted to eat nana patekars hand kheema paav actor shared an incident in interview

ऋषी कपूर यांना नाना पाटेकरांच्या हातचा खायचा होता खीमा पाव पण...; अभिनेत्याने सांगितला 'तो' भावुक प्रसंग

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.