शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिध्द मराठी अभिनेत्रीने चाहत्यांना दिली गुडन्यूज, सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत म्हणाली…

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 6, 2024 | 9:54 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi actress Samruddhi Kelkar shared the good news that she become an aunt with her fans through post on social media

सुप्रसिध्द मराठी अभिनेत्रीने चाहत्यांना दिली गुडन्यूज, सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत म्हणाली...

हल्ली सोशल मीडियावर हे भावना व्यक्त करण्याचे जणू एक माध्यमचं झाले आहे. दुःख, आनंद, शोक यांसारख्या अनेक भावभावना व्यक्त करण्यासाठी किंवा त्या भावना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणे हे खूपच पथ्याचं झालं आहे. त्यात अलीकडे अनेक कलाकार मंडळी या ओशल मीडियाद्वारे त्यांचे अनेक अपडेट्स चाहत्यांना देत असतात. अभिनेत्री समृद्धी केळकर हिनेदेखील अशीच एक गोड बातमी तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला आहे.

छोट्या पडद्यावरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेमुळे अभिनेत्री समृद्धी केळकर  ही घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेत तिने साकारलेल्या ‘किर्ती’ या पात्राला प्रेक्षकांचा भरभरून उदंड प्रतिसाद मिळाला होता. अभिनयाबरोबरच समृद्धी उत्तम नृत्यांगणा म्हणूनही ओळखली जाते. आपले हटके फोटो व डान्स व्हिडीओमुळे कायमच चर्चेत असणारी ही अभिनेत्री सध्या तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे समृद्धी मावशी झाली आहे.

आणखी वाचा – कुजलेल्या वासाने हैराण, आईला उलट्या अन्…; गश्मीर महाजनीला लागलेली वडिलांच्या मृत्यूची चाहूल, म्हणाला, “तो वास फक्त मलाच…”

समृद्धीची बहीण मानसी केळकर हिने बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे समृद्धी मावशी झाली आहे आणि हाच आनंद समृद्धीने तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. समृद्धीने “मी मावशी झाले…इट्स अ बॉय” अशी इन्स्टाग्राम स्टोरी  शेअर करत तिचा आनंद व्यक्त केला आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर झाली भावुक, म्हणाली, “दु:ख शब्दांमध्ये…”  

दरम्यान,  समृद्धीची बहीण मानसी केळकर ही डिसेंबर २०२२ मध्ये अद्वैत सोमणसह विवाहबंधनात अडकली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच समृद्धीने तिच्या बहिणीच्या डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अशातच अभिनेत्रीने ती मावशी झाल्यासची गुडन्यूजही चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

Tags: entertainment newsmarathi actressmarathi entertainment newsMarathi newssamruddhi kelkarमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी बातमीसमृद्धी केळकर
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
Kiran Rao On Sandeep Reddy Vanga

आमिर खानवर टीका केल्यानंतर पूर्वाश्रमीच्या पत्नीचा संताप, संदीप रेड्डी वंगा यांच्यावर भडकली अन्…; म्हणाली, "त्याच्या चित्रपटाबद्दल…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.