हल्ली सोशल मीडियावर हे भावना व्यक्त करण्याचे जणू एक माध्यमचं झाले आहे. दुःख, आनंद, शोक यांसारख्या अनेक भावभावना व्यक्त करण्यासाठी किंवा त्या भावना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणे हे खूपच पथ्याचं झालं आहे. त्यात अलीकडे अनेक कलाकार मंडळी या ओशल मीडियाद्वारे त्यांचे अनेक अपडेट्स चाहत्यांना देत असतात. अभिनेत्री समृद्धी केळकर हिनेदेखील अशीच एक गोड बातमी तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला आहे.
छोट्या पडद्यावरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेमुळे अभिनेत्री समृद्धी केळकर ही घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेत तिने साकारलेल्या ‘किर्ती’ या पात्राला प्रेक्षकांचा भरभरून उदंड प्रतिसाद मिळाला होता. अभिनयाबरोबरच समृद्धी उत्तम नृत्यांगणा म्हणूनही ओळखली जाते. आपले हटके फोटो व डान्स व्हिडीओमुळे कायमच चर्चेत असणारी ही अभिनेत्री सध्या तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे समृद्धी मावशी झाली आहे.

समृद्धीची बहीण मानसी केळकर हिने बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे समृद्धी मावशी झाली आहे आणि हाच आनंद समृद्धीने तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. समृद्धीने “मी मावशी झाले…इट्स अ बॉय” अशी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत तिचा आनंद व्यक्त केला आहे.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर झाली भावुक, म्हणाली, “दु:ख शब्दांमध्ये…”
दरम्यान, समृद्धीची बहीण मानसी केळकर ही डिसेंबर २०२२ मध्ये अद्वैत सोमणसह विवाहबंधनात अडकली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच समृद्धीने तिच्या बहिणीच्या डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अशातच अभिनेत्रीने ती मावशी झाल्यासची गुडन्यूजही चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.