आपल्या अभिनयशैलीने आजवर सिनेसृष्टीत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत अभिनेत्री सई ताम्हणकर हिने स्वतःच स्थान निर्माण केलं. सईने आजवर नाटक, चित्रपट व वेबसीरिजमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली. सईच्या सौंदर्याचेही लाखो दिवाने चाहते आहेत. फक्त मराठी सिनेविश्वातच नाहीतर हिंदी सिनेविश्वातही सईने आपला दबदबा निर्माण केला. मूळच्या सांगलीच्या असणाऱ्या सईने सिनेसृष्टीत कोणताही वारसा हक्क नसताना केवळ कलेच्या जोरावर सिनेसृष्टीत आपलं स्थान टिकवून ठेवलं. (saie tamhankar incident)
सईने आजवर सिनेसृष्टीत अनेक काम केली असून एका चित्रीकरणादरम्यान घडलेला गमतीशीर किस्सा सांगितला. नुकतीच सईने ‘माशाबल इंडिया’ या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना तिने शूटिंगदरम्यान तिला चक्क माकड चावलं असल्याचा किस्सा सांगितला. शूटिंगच्या ठिकाणी बाहेर असलेल्या लहान माकडाला हाय करण अभिनेत्रीला महागात पडलं. या मुलाखतीत अभिनेत्रीने हा किस्सा सांगितला.
सई म्हणाली, “मला एक दिवशी अगदी गोड माकड चावलं होतं. ते फार लहान आणि गोड माकड होतं. मला प्राणी प्रचंड आवडतात आणि प्राण्यांबद्दल मला विशेष प्रेम आहे. म्हणून त्या छोट्याश्या माकडाला पाहून मी त्या माकडाजवळ गेले आणि त्याला हाय बोलत होते. तेवढ्यात त्या माकडाला वाटलं माझ्या हातात काहीतरी खायला आहे. असं समजून तो माझ्या हाताला चावला. ते माकड लहान असलं तरी त्याच्या दाताचे व्रण माझ्या हातावर उठले होते. हा किस्सा इथेच संपला नाही. माकड चावलं हे कळल्यावर मलाच आधी हसू आलं. जेव्हा इंजेक्शन घ्यायला हॉस्पिटलला जातो तेव्हा तिथे विचारलं गेलं की, ‘कुत्रा कुठे चावला?’, तेव्हा मी म्हणाले, ‘कुत्रा नाही माकड चावलं’. त्यावेळी समोरच्या माणसाचा अर्धा वेळ हसण्यात गेला. त्यानंतर मला इंजेक्शन्स घ्यावी लागली. माकड चावल्यावर मी ३ ते ४ इंजेक्शन्स घेतली होती”.
सईने आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका करत प्रेक्षकांची मनं जिंकली. काही दिवसांपूर्वीच आलेल्या ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटामुळे ती चर्चेत आली होती. याशिवाय अभिनेत्री ‘अग्नी’, ‘डब्बा कार्टल’, ‘ग्राउंड झिरो’ या चित्रपटात झळकणार आहे.