शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : एकीने चिमटा काढला तर दुसरीने मारली कानाखाली, बेडवरच देशपांडे सिस्टर्सची मारामारी, गौतमी जोरजोरात ओरडू लागली अन्…; व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 11, 2024 | 10:17 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mrunmayee Deshpande and gautami Deshpande

Video : एकीने चिमटा काढला तर दुसरीने मारली कानाखाली, बेडवरच देशपांडे सिस्टर्सची मारामारी, गौतमी जोरजोरात ओरडू लागली अन्...; व्हिडीओ व्हायरल

सिनेसृष्टीतील बऱ्याच बहीण भावंडांच्या कलाकार जोड्या प्रसिद्ध आहेत. या भावडांच्या जोड्यांनी आजवर त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशातच आता प्रेक्षकांची लाडकी भावंडांपैकी एक जोडी म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडे व मृण्मयी देशपांडे. गौतमी व मृण्मयी या दोघीही अभिनय क्षेत्रात कार्यरत असून लोकप्रिय अभिनेत्रींनपैकी एक आहे. गौतमी व मृण्मयी या सख्ख्या बहिणी असून दोघांमधील बॉण्डिंग नेहमीच आपल्याला पाहायला मिळालं आहे. आजवर दोघींनी सिनेविश्वात एकत्र काम केलं नसलं तरी सोशल मीडियावर त्या बरेचदा एकत्र पाहायला मिळतात. (Mrunmayee Deshpande and gautami Deshpande)

सोशल मीडियावर गौतमी व मृण्मयी दोघीही बऱ्यापैकी सक्रिय असतात. विशेषतः मृण्मयी गौतमीबरोबरचे अनेक रील व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. गौतमीला बहुतेकदा मृण्मयी त्रास देतानाचे व्हिडीओ शेअर करते. दोघींचे एकत्र अनेक रील व्हिडीओ पाहून नेटकरीही त्यांच्या व्हिडीओला पसंती दर्शवताना दिसतात. अशातच आता गौतमी मृण्मयीने ‘सिबलिंग डे’निमित्त शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

आणखी वाचा – ‘आठवी अ’ला मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादानंतर मराठीत नव्या वेबसीरिजची घोषणा, ‘रस्त्यावरची शाळा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

View this post on Instagram

A post shared by Mrunmayee Deshpande – Rao (@mrunmayeedeshpande)

या व्हिडीओमध्ये मृण्मयी गौतमीला त्रास देताना दिसत आहे. गौतमी मृण्मयी झोपलेले असताना मृण्मयीला झोप येत नाही म्हणून गौतमीचा जबरदस्ती हात घेत ती थोपटायला लावते आणि तिला झोपवायला सांगते. मात्र गौतमी तसं करण्यास नकार देते. तेव्हा ती जोरात तिचा हात बेडवर आपटते. हे सर्व त्यांची आई पाहत असते. आईने पाहिल्यानंतर त्या मृण्मयीला चांगलंच खडसावते. हे पाहून मृण्मयी झोपायचं नाटक करते. हा दोघी बहिणींचा गमतीशीर व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा – आज प्रीती योग, आयुष्मान योगामुळे ‘या’ राशींना होणार आर्थिक गुंतवणूकीचा फायदा, तर कुणाच्या नशिबात नेमकं काय? जाणून घ्या…

या व्हिडीओला नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया द्यायलाही सुरुवात केलेली पाहायला मिळत आहे. “अरे देवा यांची भांडण कधी संपायची”, “तुम्ही दोघी अशक्य आहात खूप छान”, “आईचा ओरडा आवडला आणि लहानपणीची आठवण झाली”, अशा अनेक कमेंट करत व्हिडीओला पसंती दर्शविली आहे. शिवाय एका नेटकऱ्याने गमतीशीर कमेंट, “या दोघी नवऱ्याच्या घरी राहत नाही का?”, असा प्रश्न केला आहे. यावर गौतमीने हसण्याचं इमोजी पाठवलं आहे.

Tags: entertainmentmarathi actressmrunmayee deshpandeMrunmayee Deshpande and gautami Deshpande
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Prathmesh Laghate Fan Moment

वादळी वारा अन् गारांचा पाऊस तरीही…; वर्ध्यातील प्रथमेश लघाटेच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी, भारावून गेला, म्हणाला, "पहाटे ५ वाजता…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.