‘बिग बॉस मराठी’ या बहुचर्चित कार्यक्रमामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. या शोमध्ये सईचे विविध पैलु पाहायला मिळाले. तिने या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांचं उत्तम मनोरंजन केलं. सोशल मीडियावर ही सई बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर सई मात्र कुठेही झळकली नाही. कालांतराने तिने तीर्थदीप रॉय बरोबर लग्न सोहळा उरकला. सई तिच्या लग्नामुळेही पुन्हा एकदा चर्चेत आलेली पाहायला मिळाली. (Sai Lokur Birthday)
कलाविश्वात यश मिळवल्यावर सईने वैयक्तिक आयुष्यात २०२० मध्ये तीर्थदीप रॉयबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नाच्या ३ वर्षांनंतर म्हणजेच १७ डिसेंबर २०२३ रोजी सईने तिच्या बाळाचं स्वागत केलं. आपल्या बाळाची विशेष काळजी घेण्यासाठी सईने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला. त्यानंतर सईने खास फोटोशूट करत गरोदर असल्याचं सांगितलं. दरम्यान सईच्या खास डोहाळ जेवणाचे फोटो समोर आले. सईच्या डोहाळ जेवणाचेही बरेच फोटो व्हायरल झाले. आज सईचा वाढदिवस आहे.
आणखी वाचा – इतकी सुंदर व गोंडस दिसते सई लोकुरची लेक, पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा, म्हणाली, “आई म्हणून माझा…”
तसेच सईने एक पोस्ट शेअर करत तिला तिच्या नवऱ्याने दिलेल्या भेटवस्तूचा एक व्हिडीओ शेअर केला होता. सईचा यंदाचा हा वाढदिवस तिच्या नवऱ्याने अधिक खास बनवला. “यंदाचा वाढदिवस खूप खास आहे. खूप खूप धन्यवाद जान. मला माझी भेट पूर्णपणे आवडली. आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करते”, असं म्हणत तिने नवऱ्याने दिलेल्या भेटवस्तूचा फोटो शेअर केला आहे. सईला तिच्या नवऱ्याने खास घड्याळ भेटवस्तू म्हणून दिलं आहे. सईने तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावरुन आणखी एक खास पोस्ट शेअर केली. अभिनेत्रीने पहिल्यांदाच तिच्या मुलीचा फोटो चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. सईने याआधी तिच्या मुलीबरोबरचे काही खास क्षण सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले होते. मात्र तिने कधीच तिच्या मुलीचा चेहरा दाखवला नव्हता.
सईने लेकीबरोबरचा गोंडस फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, “आज माझ्या वाढदिवसाच्या या शुभ प्रसंगी, मी तुम्हाला देवाने मला दिलेल्या सर्वोत्तम भेटवस्तूची ओळख करुन देऊ इच्छिते. माझी प्रिय मुलगी ताशी. तिचा पहिल्यांदाच फोटो शेअर करत आहे. ती माझ्यासाठी जग आहे आणि मी तिच्यावर किती प्रेम करते हे मला शब्दांत व्यक्त करता येणार नाही. आई म्हणून हा माझा पहिला वाढदिवस आहे आणि मी देवाकडे आणखी काही मागू शकत नाही. ताशी ही माझे जीवन आहे आणि ती मला मिळालेली सर्वात चांगली भेट आहे”.