मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेमधील अभिनेता अभिषेक गांवकरने विवाह गाठ बांधली. त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकण्यास सज्ज झाली आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे. मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून रेश्मा शिंदे ओळखली जाते. स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा या मालिकेने तिच्या लोकप्रियतेत वाढ केली. या मालिकेनंतर ती नुकतीच स्टार प्रवाह वरील एका मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. (Reshma Shinde Haldi Ceremony)
स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील जानकी या पात्राद्वारे ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी रेश्मा शिंदे आता तिच्या आयुष्यातील एका नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहे. रेश्मा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या घरी लग्नाआधीच्या विधींनी सुरुवात झाली असून नुकताच काल तिचा मेहंदी सोहळा पार पडला.
या मेहंदी सोहळ्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आज तिचा हळदी सोहळा पार पडत आहे आणि याचे फोटो व व्हिडीओदेखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या हळदी सोहळ्यासाठी रेश्माने खास हिरव्या रंगाची साडी परिधान केली असून त्यावर पिवळ्या रंगाचा ब्लाउजही परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. तसंच हातामध्ये रेश्माने खास ज्वेलरीही घातली आहे.
आणखी वाचा – Navri Mile Hilerla मालिकेला नवं वळण, सूनांची एजेंसमोर वेगळीच अट, लीलाला घराबाहेर काढणार?
या व्हायरल व्हिडीओ मध्ये रेश्माचे सौंदर्य आणखीनच खुलून आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पासून अभिनेत्रीच्या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती आणि अखेर अभिनेत्री आता विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाची सध्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.