झी मराठी वाहिनीवरील सारं काही तिच्यासाठी या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता अभिषेक गांवकर हा नुकताच विवाहबंधनात अडकला. त्याने सोशल मीडिया स्टार सोनाली गुरवबरोबर विवाहगाठ बांधली. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्यांचा साखरपुडा पार पडला होता. तेव्हापासून चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत होते. अशातच २६ नोव्हेंबर रोजी सोनाली आणि अभिषेक यांचा मालवणात विवाहसोहळा पार पडला. दोघांच्या लग्नातील पहिला फोटो अभिनेता पियुष रानडेने इन्स्टाग्रावर शेअर केला होता. (Abhishek Gaonkar and Sonalee Gurav Ukhana)
सोनाली-अभिषेकने लग्न सोहळ्यात पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं. नाकात नथ, हिरवा चुडा आणि सुंदर भरजरी साडी या लूकमध्ये नववधू अतिशय सुंदर दिसली. तर अभिषेकनेही तिला साजेसा असा लूक केल्याचे पहायला मिळाले होते. त्यांच्या लग्नाच्या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. अशातच दोघांच्या लग्नामधील आणखी एक खास व्हिडीओ समोर आला आहे.अभिषेक-सोनाली यांच्या लग्नातील त्यांनी एकमेकांसाठी घेतलेल्या उखाण्यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
यावेळी सोनाली उखाणा घेत असं म्हणते की, “गळ्यातील मंगळसूत्र ही सौभाग्याची खून, अभिषेक रावांचं नाव घेते गावकरांची सून”. तर अभिषेकही सोनालीसाठी खास उखाणा घेत असं म्हणतो की, “चाफा बोलेना, चाफा चालेना वमिकाचं माझ्याशिवाय पानंच हलेना”. अभिषेक-सोनाली यांचा हा उखाण्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या अनेक चाहते मंडळींनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – रेश्मा शिंदेच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, होणाऱ्या नवऱ्याची नावाची लागली हळद, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, ‘सारं काही तिच्यासाठी’ या ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिकेमुळे अभिनेता सर्वत्र चर्चेत आला. यामध्ये अभिषेक गावकरने ‘श्रीनू’ ही भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर त्याची बायको सोनाली गुरव ही सोशल मीडियावर मजेशीर रील्स व्हिडीओ बनवत असते. तिच्या रील्सला मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळतात. दोघांनी अनेक वर्षांच्या रिलेशननंतर एकमेकांबरोबर साताजन्माच्या गाठी बांधल्या आहेत.