रविवार, जून 28, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मराठी लोकांना घर न देणाऱ्यांना…”, मतदान करणाऱ्यावरुन रेणुका शहाणेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, “कुठल्याही जाती, धर्म, भाषेच्या विरुद्ध नाही पण…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 7, 2024 | 3:49 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi Actress Renuka Shahane shared a critical post against denying jobs to Marathi people

"मराठी लोकांना घर न देणाऱ्यांना...", मतदान करणाऱ्यावरुन रेणुका शहाणेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, "कुठल्याही जाती, धर्म, भाषेच्या विरुद्ध नाही पण..."

काही दिवसांपूर्वी एका नोकरीच्या जाहिरातीत मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये असं म्हटलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. लिंक्डिनवर एक जाहिरात करण्यात आली होती. त्यामध्ये मुंबईत ग्राफिक्स डिझाईनसाठी जागा असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, मराठी माणसाने अर्ज करु नये, असे म्हटल्याने महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला होता. मुंबईसह राज्यात संबंधितांविरोधात संताप व्यक्त करण्यात आल्यानंतर दिलगिरी व्यक्त करण्यात आली.

अशातच या सगळ्या प्रकरणावर आता अभिनेत्री रेणुका शहाणेची पोस्ट चर्चेत आली आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) मराठी माणसांबरोबरच्या या दुजाभावावर संताप व्यक्त केला आहे. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना रेणुका शहाणे यांनी मराठी माणसांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल व त्यांच्याबरोबरच्या दुजाभावाबद्दल, त्याचबरोबर त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना मतदान न करण्याचे आवाहन केले आहे.

मराठी "not welcome" म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका ????????
मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका ????????
ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला…

— Renuka Shahane (@renukash) May 7, 2024

रेणुका यांनी त्यांच्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “मराठी ‘Not Welcome’ म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका. मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका. ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका.”

आणखी वाचा – शेखर राजाध्यक्ष नेत्रा नव्हे तर रुपालीच्याच बाजूने असल्याचं समोर, देवीआईच्या लेकींना हे सत्य कधी समजणार?, बळी गेल्यानंतर काय घडणार?

यापुढे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत असं म्हटलं आहे की, “मी कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे”.

आणखी वाचा – “वडिलांच्या जाण्याने आईच्या आयुष्यात…”, वडील गेल्यानंतर आईच्या झालेल्या अवस्थेबाबत रितेश देशमुखचं भाष्य, म्हणाला, “ती शेती करते आणि…”

दरम्यान, रेणुका यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी या पोस्टवर रेणुका यांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. तुम्ही दाखवलेल्या या भूमिकेबद्दल तुमचे अभार म्हटलं आहे, तर काहींनी त्यांच्याया पोस्टला विरोध केला आहे. तुम्ही मराठीत किती चित्रपट केले आहेत असा प्रश्न विचारला आहे, तर काहींनी उगाच उमेदवार किंवा पक्ष मध्ये आणण्यापेक्षा त्या संबंधित कंपनीविरुद्ध तक्रार का नाही” असा सवाल केला आहे.     

Tags: marathi actressmarathi entertainment newsrenuka shahane
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Sakav Webseries Actors
Entertainment

‘गाव गाता…’ नंतर दिगंबर नाईक व अस्मिता खतखते पहिल्यांदाच एकत्र, ‘साकव’वेबसीरिजमध्ये झळकणार

जून 28, 2026 | 11:00 am
Daryabhavani Movie poster release
Entertainment

सागरी सामर्थ्याचा गौरवशाली इतिहास दिसणार ‘दर्याभवानी’मध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलझुंजाची गाथा उलगडणार

जून 27, 2026 | 4:12 pm
mumbai local train news
Entertainment

“सरकार काय करतंय, इथे जीवाची किंमत नाही”, मुंबई लोकल ट्रेनमध्ये तरुणाच्या हत्येने सुप्रसिद्ध अभिनेत्रीला धक्का, म्हणाली…

जून 27, 2026 | 12:50 pm
Hardik Pandya and Mahieka Sharma get married
Entertainment

कपाळाला टिकली, भांगेत सिंदूर आणि…; हार्दिक पांड्याने केलं गुपचूप लग्न? गर्लफ्रेंडबरोबरचे फोटो व्हायरल

जून 27, 2026 | 10:33 am
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi marathi serial new promo audience expressed their displeasure through comments

"अजून किती मुर्खपणा दाखवणार", 'सातव्या मुलीची…'मधील रुपाली व नेत्रामधील युद्ध पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, "रुपालीची भूमिका संपवा आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.