शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रिया बापटला इतर गृहिणींप्रमाणेच आहे ‘ही’ सवय, स्वत:च दिली जाहीर कबुली, म्हणाली, “कितीही वाजता घरी आले तरी…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 30, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actress Priya Bapat said that to she cleaned the kitchen no matter how late comes from shooting

शूटिंगवरुन कितीही उशिरा आली प्रिया बापट करते ‘हे’ काम, स्वत:चा केला खुलासा

मराठी अभिनेत्री प्रिया बापट ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठीबरोबरच बॉलिवूडची सुद्धा ती लाडकी बनली आहे. बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारी प्रिया आता मालिका, चित्रपट, नाटक आणि वेबसीरिज यांसारख्या वेगवेगळ्या माध्यमांवर आपल्या अभिनयाची झळक दाखवत आहे. याशिवाय प्रियाने निर्माती म्हणूनही काम करण्यास सुरुवात केली आहे. तिचं ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक सध्या रंगभूमीवर चांगलंच गाजत आहे. ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘हॅप्पी जर्नी’ अशा अनेक चित्रपटांमधून तिने आपला सशक्त अभिनय केला आहे.  (priya bapat news)

अभिनेत्री, निर्माती असण्याबरोबरच प्रिया ही एक उत्तम गृहिणीही आहे आणि याबद्दल तिने स्वत: एक किस्सा सांगितला आहे. प्रिया बापट शूटिंगवरुन कितीही वाजता घरी गेली तरी तिला स्वयंपाकघराचा ओटा साफ करण्याची सवय आहे आणि याबद्दल तिने स्वत: सांगितलं आहे. ‘अमुक तमुक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने याबद्दल सांगितलं आहे. यावेळी प्रियाने असं म्हटलं आहे की, “मला अजूनही ती सवय आहे की, मी कितीही वाजता घरी आले तरी मी स्वयंपाक घरात जाते आणि ओटा स्वच्छ आहे की नाही ते बघते. नसेल तर मी तो ओटा साफ करते”.

View this post on Instagram

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

आणखी वाचा – Video : …अन् चालू नाटकातच शरद पोंक्षे सर्वकाही विसरले, पुन्हा प्रेक्षकांसमोर येऊन रडू लागले आणि…; व्हिडीओ व्हायरल

यापुढे ती म्हणाली की, “त्यानंतर मी पाणी भरते, माझी बाटली भरते आणि मगच बेडरुममध्ये जाते. अगदी कितीही म्हणजे कितीही वाजले असले तरी मी हे करते. पहाटे दोन-तीन-चार, रात्री बारा, सकाळची शिफ्ट, रात्रीची शिफ्ट काहीही असूदे. मी आले की चप्पल काढते आणि लगेच स्वयंपाकघरात जाते. ओटा बघते, ओटा स्वच्छ असेल की नाही बघते, नसेल तर करते आणि मगच झोपते. तर अशी आहे प्रिया बापट, आवडले तर आवडले? नाही आवडले तर काय करु?”  

आणखी वाचा – सुरेश धस प्रकरणी प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट, कारवाई करण्याचे आदेश, न्याय मिळणार का?

दरम्यान, टेलिव्हिजन मालिका असो किंवा रुपेरी पडदा मनोरंजन विश्वातील प्रत्येक माध्यमात प्रिया बापटने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रियाने मराठीसह अनेक हिंदी सीरिजमध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. प्रिया उत्तम अभिनेत्री आहेच पण, त्याचबरोबर तिचा आवाज देखील तितकात सुमधूर आहे. अनेकदा प्रिया जुनी गाणी गातानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

Tags: priya bapatpriya bapat newspriya bapat said she cleaned after comes from shooting
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
31 december Tuesday daily horoscope How will the last day of the year 2024 be for you

31 December Horoscope : २०२४ या वर्षाचा शेवटचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? तुमच्या नाशिबात नेमकं काय? जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.