‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिने शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्स व कमेंट्सचा नेहमीच पाऊस पडताना दिसतो. सध्या प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात निवेदकाची भूमिका साकारताना दिसतेय. (Prajakta Mali New Dress)
प्राजक्ताने आजवर तिच्या स्वमेहनतीने स्वतःच सिनेसृष्टीतील स्वतःच असं स्थान स्वतः निर्माण केलं आहे. अभिनय, दागिन्यांचा व्यवसाय, डान्स क्लासेस, सगळंच ती मोठ्या उत्साहात करते. हटके आऊटफिट घालून नेहमीच ती फोटोशूट करत असते. अशातच प्राजक्ताने घातलेल्या एका नव्या आऊटफिटची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळतेय. प्राजक्ताने एक आऊटफिट घालून फोटोशूट केलं आहे ज्याकडे तिच्या चाहत्यांच्या नजरा वळल्या आहेत.
प्राजक्ताने लेहेंगा घातलेल्या फोटोची चाहत्यांमध्ये चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहेत. या आऊटफिटचं वजनही जरा जास्त असल्याचं कळतंय. गुलाबी लेहेंग्यातले फोटो प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. राणी कलरच्या लेहेंग्यात ती अतिशय सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करताना प्राजक्ताने लिहिलेल्या कॅप्शनचीही चाहत्यांमध्ये चर्चा आहे. मात्र लेहेंग्याच्या वजनाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्राजक्ताने या फोटोंमध्ये तब्बल १२ किलोचा लेहेंगा घातला आहे.
तिने हे सुंदर फोटो शेअर करत, “नैनों से नैना जो मिला के देखे, मौसम के साथ मुस्कुरा के देखे, दुनिया उसी की है जो आगे देखे, मूड मूड के ना देख मूड मूड के (मूड मूड के सोडा समोर बघूनही नीट चालता येत नव्हतं, हा घागरा तब्बल १०-१२ किलोंचा होता. पण होता सुंदर) असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या वजनदार घागऱ्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. चाहतेही तिच्या या घागऱ्याच्या वजनाचं आश्चर्य व्यक्त करत आहेत.