सध्या हिंदी टेलिव्हिजन शो ‘बिग बॉस १८’ खूप चर्चेत आहे. लरवकच या कार्यक्रमाचा अंतिम सोहळा पार पडणार आहे. विवियन डीसेना, करणवीर मेहरा असे अनेक स्पर्धक एकमेकांना तगडी टक्कर देत आहेत. नुकताच या शोमध्ये फॅमिली विकेंड होता. यामध्ये विवियनची बायको नुरन अली व मुलगी आली होती. अशातच आता नुरने विवियनची पहिली पत्नी वाहबीज दोराबजीबद्दल भाष्य केले आहे. त्यामुळे ती आता पुन्हा चर्चेत आली आहे. पण नुराने वहाबीजबद्दल काय भाष्य केले आहे? त्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया. (nouran aly on vivian dsena first wife)
विवियनबद्दल नुरानने आजवर अनेकदा भाष्य केले आहे. दरम्यान आता तिने वाहबीजबद्दल भाष्य केले आहे. यावेळी तिने घटस्फोटाबद्दल खुलेपणाने भाष्य केले आहे. यावेळी ती मुलाखतीमध्ये म्हणाली की, “घटस्फोट हा काही खुश होण्याचा पर्याय नसतो. मी कोणाकडूनही काहीही हिरावून घेत नाही आहे. एक महिला म्हणून त्यांना खूप काही सहन करावं लागत असेल. कोणताही घटस्फोट खुश करणारा नसतो. दोघांनाही त्रास होतो. जर वहाबीज मानसिक त्रासातून गेली असेल तर तसं होऊ शकतं. जर तुमचा घटस्फोट झाला असेल तर समाज तुम्हाला सुखाने राहू देत नाही”.
विवियन व वाहबीज यांनी लग्न केले होते. दोघांचीही ओळख ‘प्यार की ये एक कहानी’ या मालिकेदरम्यान झाली. त्यानंतर दोघही २०१३ साली लग्नबंधनात अडकले. २०२१ साली दोघांनीही घटस्फोट घेतला. नंतर २०२२ साली विवियनने दुसरं लग्न केले. त्याने धर्म बदलून मुस्लिम धर्म स्वीकारला. त्याआधी तो ख्रिश्चन धर्माचे पालन करत असे.
दरम्यान नुरानने याआधी खुलासा केला होता. तेव्हा ती म्हणाली की, “मी जेव्हा विवियनबरोबर लग्न केले तेव्हा आम्हाला ट्रोल केले. त्यांचे लग्न म्हणजे ‘लव्ह जिहाद’ही बोलले गेले. विवियने २०१९ साली मुस्लिम धर्म स्वीकारला असल्याचेही नुरानणए सांगितले.