मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सध्या खूप चर्चेत आली आहे. मात्र सध्या बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणावरुन सुरेश धस बीड येथे मोठी चर्चा सुरु आहे. यावेळी एकदा सुरेश धस यांनी प्राजक्ताचे नाव घेतले होते. यावरुन आता प्राजक्ताने संताप व्यक्त केला आहे. याबद्दल प्राजक्ता आता महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचीही माहितीदेखील समोर आली आहे. दरम्यान सुरेश म्हणाले होते की, “आम्ही बघत असतो रश्मिका मंदना, प्राजक्ता माळी, सपना चौधरी यांचे जे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यांचा जवळचा पत्ता परळी पॅटर्नकडे आहे. धनुभाऊ आपले विमान खाली आणा. तुम्हाला पालकमंत्री व्हायचे आहे. आमचं लेकरू गेलं. हा काही राजकीय विषय नाही”. दरम्यान या सगळ्यामध्ये प्राजक्ताचे नाव आल्याने आता मोठं वाद निर्माण झाला आहे. (prajakata mali press conference)
याबरोबरच सुरेश धस म्हणाले की, “जर कोणाला चित्रपट काढायचा असेल तर आशा मोठ्या विभूतींवर काढता येईल. प्राजक्ताताई माळीदेखील आमच्या परळीमध्ये येतात. परळीचा हादेखील एक पॅटर्न आहे”. दरम्यान सुरेश धस यांच्या या वक्तव्यावर प्राजक्ता त्यांच्या विरोधात महिला आयोगात तक्रार करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यानुसार, प्राजक्ताची पत्राकार परिषद पार पडली आहे. प्राजक्ताने या पत्रकार परिषदेत धस यांच्या विरोधातील संताप व्यक्त केला आहे.यावेळी तिची आईदेखील उपस्थित असलेली दिसून आली.
दरम्यान या सगळ्यावर आता प्राजक्ताने या सगळ्या वादामध्ये व्यक्त होण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली की, “सुरेश धस यांनी माझी जाहिररित्या माफी मागावी. राजकीय गोष्टींसाठी फिल्म इंडस्ट्रीमधल्या कोणत्याही महिलांच्या नावाचा गैरवापर होऊ नये. मी महिला आयोगाकडे तक्रारही केली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही यावर योग्य ती कारवाई करावी अशी मी त्यांना विनंती केली आहे. प्रसार माध्यमं एक व्हिडीओ घेऊन हजारो विचित्र व्हिडीओ बनवतात. पण याचा त्या कलाकारावर, त्याच्या कुटुंबावर काय परिणाम होतो याचा तुम्ही विचार करत नाही का?. नैराश्येमध्ये जाऊन ती व्यक्ती आत्महत्या करेल याचा तुम्हाला विचार येत नाही का?. ही माझी आई गेले दिड महिना शांत झोपली नसेल. माझा भाऊही इथे आहे. त्याने तर सोशल मीडियाच बंद केलं आहे. कलाक्षेत्रात काम करणाऱ्या मुलीची प्रतिमा अशाप्रकारे खराब करणं आणि त्याला तोंड देणं अजिबात सोपी गोष्ट नाही.
आणखी वाचा –उर्मिला कोठारेच्या गाडीची दोन मजुरांना धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय झालं?
पुढे ती म्हणाली की, “याचा माझ्या कुटुंबियांवरही आता परिणाम होत आहे. तसेच माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेब यांनाही मी विनंती करते की, त्यांनी याविरोधात कठोर कारवाई करावी. कोणताही पुरवा असल्याशिवाय कोणीच बातमी करु नये अशा प्रकारचे त्यांनी आदेश द्यावेत”. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचेही सांगितलं.