शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सासरच्या मंडळींसह परदेशात गेली पूजा सावंत, होणाऱ्या नवऱ्याबरोबरचा फोटो पोस्ट करत म्हणाली, “माझं आयुष्य…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 9, 2023 | 12:12 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Pooja Sawant New Post

सासरच्या मंडळींसह परदेशात गेली पूजा सावंत, होणाऱ्या नवऱ्याबरोबरचा फोटो पोस्ट करत म्हणाली, "माझं आयुष्य..."

बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून पूजा सावंत हिचं नाव आवर्जून घेतलं जातं. आजवर पूजाने तिच्या अभिनयाने तसेच तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तरुणाईला तर अभिनेत्रीने तिच्या सौंदर्याने घायाळ केलं आहे. अशातच अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने प्रेमाची जाहीर कबुली दिली. ती प्रेमात पडल्याचं सांगत आयुष्यातला नवा प्रवास सुरू करत असल्याचं तिने म्हटलं होतं. (Pooja Sawant New Post)

अभिनेत्रीने दिलेल्या या आनंदाच्या बातमीनंतर अनेकांची मनंही दुखावली. सोशल मीडियावरून तिने तिच्या जोडीदाराचे फोटो शेअर करत साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सुरुवातीला तिने पाठमोरे फोटो शेअर करत तिने जोडीदाराचं नाव किंवा चेहरा दाखवला नव्हता. त्यानंतर अभिनेत्री पूजा सावंतने पुन्हा सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिचा जोडीदार कोण आहे याचा खुलासा करत नावही सांगितलं.

आणखी वाचा – “झिम्मा २ किती वेळा पाहिला?” हेमांगी कवीला नेटकऱ्याने डिवचताच दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, “आपण तुलना करण्यातच…”

View this post on Instagram

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

पूजा सावंतने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे फोटो शेअर करत त्याचं नाव सांगतिलं. पूजा सावंतच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्धेश चव्हाण आहे. सिद्धेश चव्हाण अभिनेता वा इंडस्ट्रीतील व्यक्ती नसून तो ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी करत असल्याची माहिती आहे. दोघांनी साखरपुडा सोहळा उरकला असल्याचं समोर आलं आहे. कारण पूजाने अंगठी फ्लॉन्ट करतानाचे फोटो चाहत्यांसह शेअर केले होते.

आणखी वाचा – ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने केलं दुसरं लग्न, फोटो पोस्ट करत म्हणाली, “हा निर्णय घ्यायला हिम्मत आणि…”

View this post on Instagram

A post shared by Siddesh Chavan (@siddy.16)

त्यानंतर आता पूजाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. तिच्या या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पूजा तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या कुटुंबासह फिरायला गेली असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान पूजाने तिच्या पतीबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टला तिने “तुझ्या येण्याने माझं आयुष्य आणखी रंगीन झालं आहे” असं कॅप्शन दिलं आहे. तर तिच्या नवऱ्याने म्हणजेच सिद्धेशने एकत्र कुटुंबाबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. सध्या पूजा तिच्या सासरच्या मंडळींसह क्वालिटी टाईम घालवताना दिसत आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट व लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Tags: entertainmentmarathi actressmarathi moviepooja sawantpooja sawant husbandpooja sawant new post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
london misal fame actress ritika shrotri appreciated to rutuja bagwe for her descion in interview)

ऋतुजा बागवेने चित्रपटातील स्वतःचे सीन्स काढण्यास सांगितले अन्…; रितिका श्रोत्रीचा खुलासा, म्हणाली, "पहिलाच चित्रपट तरीही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.