अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे विविध व्हिडिओ तसेच फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. शिवाय ती तिच्या कामाच्या अपडेट देखील चाहत्यांबरोबर शेअर करत असते. पूजा सावंतचा सध्या व्हेकेशन मूड ऑन आहे. पूजा परदेशात गेली असून तिथे ती सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. पदेशतील निसर्गाचा आनंद घेण्यात पूजा रमली असून याचे काही खास फोटो व व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. पूजा तिच्या नवऱ्याबरोबर परदेशातील तिचे खास क्षण एन्जॉय करत आहे. पूजाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये पूजा नवऱ्याबरोबर शेअर सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. कालच्या रविवारच्या सुट्टीनिमित्त पूजा नवऱ्याबरोबर फिरायला गेली असून तिने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे तिच्या व सिद्धेशच्या फोटोंचे कोलाज केले आहे.
यामध्ये पहिल्या कोलाजमध्ये सिद्धेशचा फोटो आहे, दुसऱ्यामध्ये तिने समुद्राचा वह्यू दाखवला आहे, तिसऱ्या कोलाजमध्ये गाडीतील फोटो पाहायला मिळत आहे, तर चौथ्या फोटोमध्ये तिने दोघांचा सेल्फी फोटो टाकला आहे. पूजाचा नवरा सिद्धेश चव्हाण हा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. त्यामुळे तीसुद्धा लग्नानंतर काही दिवसांसाठी ऑस्ट्रेलियाला गेली. परदेशात अभिनेत्रीने लाडक्या नवऱ्याबरोबर एकत्र होळी व गुढीपाडव्याचा सण साजरा केला होता.

अशातच ती कामानिमित्त भारतात येते आणि मग पुन्हा ऑस्ट्रेलियाला जाते. लग्नाआधी पूजाला लग्नानंतर ऑस्ट्रेलियात स्थायिक होणार की नाही? असं विचारण्यात आलं होतं. यावर “काही वर्षांसाठी सिद्धेश ऑस्ट्रेलियात आहे. म्हणून मी काही वर्ष येऊन जाऊन करेन. हे अरेंज मॅरेज असल्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टींसाठी तयार आहोत.” असं पूजाने सांगितलं होतं.

आणखी वाचा – ‘कट्यार काळजात घुसली’नंतर सुबोध भावेचा नवा संगीतमय चित्रपट, ‘संगीत मानापमान’चा टीझर प्रदर्शित, व्हिडीओ समोर
‘महाराष्ट्राची कलरफुल’ अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं. ‘मन धागा धागा जोडते नवा’ म्हणत पूजाने मराठीसह हिंदी सिनेविश्वातदेखील तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. आपल्या अभिनयाने व हटके स्टाईलमुळे चर्चेत राहणारी पूजा तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली.