‘बिग बॉस’ मराठीच्या नवीन पर्वाला नुकतीच सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी या शोमध्ये नवीन ट्विस्ट आला आहे. नुकताच पहिल्या भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला असून, पहिल्याच दिवशी स्पर्धकांची तारांबळ उडताना या प्रोमोमध्ये दिसत आहे. ‘बिग बॉस’ मराठीच्या नवीन पर्वातील पहिला दिवस स्पर्धकांसाठी कठीण जाणार असल्याचे य नवीन प्रोमोमध्ये दिसत आहे. कलर्स मराठीने प्रदर्शित केलेल्या या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरातील पाणी बंद असल्याचे दिसत आहे. प्रोमोमध्ये दिसत आहे की, स्पर्धकांना घरात पाणी नसल्याची जाणीव होते. त्यावेळी ते बिग बॉसला घरात पाणी नसल्याने अडचण निर्माण होत असल्याचे सांगत आहेत.
दिवसाच्या सुरुवातीला सगळ्यात आधी अंघोळ करायची असते. त्यासाठी पाणी पाहिजे असतं. पण, घरात पाणी नाही असे वर्षा उसगांवकर म्हणताना दिसत आहेत. त्यावर आता घरातील पाणी गेले आहे. थोड्याच वेळात सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळेल, असे बिग बॉस म्हणतात. त्यानंतर सदस्यांच्या चेहऱ्यावर पुढे काय होणार? याची भीती स्पष्टपणे दिसत आहे. हा नवीन प्रोमो पाहून घरातील सदस्यांना घरातील पहिल्या दिवसापासूनच खूप मेहनत व आव्हानांचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
आणखी वाचा – ‘कट्यार काळजात घुसली’नंतर सुबोध भावेचा नवा संगीतमय चित्रपट, ‘संगीत मानापमान’चा टीझर प्रदर्शित, व्हिडीओ समोर
यंदाच्या पर्वामध्ये अभिनय क्षेत्रातील कलाकारांसह यूट्यूबवरील प्रसिद्ध चेहरेदेखील दिसत आहेत. कोकण हार्टेड गर्ल, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, योगिता चव्हाण, वर्षा उसगांवकर, इरिना रुडाकोवा, अरबाज पटेल, आर्या जाधव, वैभव चव्हाण, सूरज चव्हाण, घनश्याम दरवडे, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, पंढरीनाथ कांबळे, निखिल दामले यांबरोबरच ‘बिग बॉस हिंदी’ फेम निक्की तांबोळी यांनी नवीन पर्वात सहभाग घेतला आहे.
आणखी वाचा – पुन्हा परदेशात गेली पूजा सावंत, नवऱ्याबरोबर एन्जॉय करत आहे प्रत्येक क्षण, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, नुकतीच ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाला धमाकेदार सुरुवात झाली असून हा नेत्रदीपक सोहळा प्रेक्षकांना कलर्स मराठी वाहिनीसह जिओ सिनेमावरही पाहता येणार आहे. रोज रात्री ९ वाजता ‘बिग बॉस मराठी’ हा शो बघता येणार आहे. २४ तास ड्रामा सुरु असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यावर्षी काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.