गुरूवार, जुलै 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘कट्यार काळजात घुसली’नंतर सुबोध भावेचा नवा संगीतमय चित्रपट, ‘संगीत मानापमान’चा टीझर प्रदर्शित, व्हिडीओ समोर

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 29, 2024 | 2:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Subodh Bhave directed Sangeet Manapmaan marathi movie teaser released.

'कट्यार काळजात घुसली'नंतर सुबोध भावेचा नवा संगीतमय चित्रपट, 'संगीत मानापमान'चा टीझर प्रदर्शित, व्हिडीओ समोर

सुबोध भावेने प्रथम दिग्दर्शन केलेला ‘कट्यार काळजात घुसली’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या चित्रपटातील गाणी तितक्यात आवडीने ऐकली जातात. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला २०२२ला सात वर्षे पूर्ण झाली होती. याच औचित्य साधून सुबोध भावेने पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. हाअ चित्रपट म्हणजे ‘संगीत मानापमान’. ‘कट्यार काळजात घुसली’नंतर सुबोध भावे आणखी एक भव्यदिव्य संगीतमय नजराणा ‘संगीत मानापमान’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे.  नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. सुबोध भावेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला असून यात चित्रपटातील खास क्षणांची झलक पाहायला मिळत आहे.

“स्वर, सौंदर्य आणि शौर्याचा अद्भुत मिलाफ! सादर आहे कै.कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या कलाकृतीवरून प्रेरीत ‘संगीत मानापमान’ या संगीतमय चित्रपटाची झलक.. येत्या दिवाळीत रुपेरी पडद्यावर अनुभवूया मराठी परंपरेचा साज आणि सुरेल गीतांचा आवाज” असं म्हणत हा खास टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे धैर्यधरची भूमिका साकरणार आहे. धैर्यधरला सैन्यात भरती होण्याची इच्छा आहे. पण त्याची आई त्याचया इच्छेच्या विरोधात असून त्याला लग्नबंधनात अडकण्याच्या घाईत आहे. त्यामुळे हा धैर्यधर नक्की कोण आहे? धैर्यधर हा राजा नाही ना? किंवा त्याचा पुर्जजन्म झाला नाही ना? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे यात गुपित ठेवण्यात आली आहेत.

View this post on Instagram

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

आणखी वाचा – “दोन कानाखाली मारायलाही मी…”, अश्विनी भावेंनाही इंडस्ट्रीमध्ये वाईट अनुभव, म्हणाल्या, “लोक मला घाबरतात आणि…”

सुबोधने आजवर अनेक मालिका, चित्रपट व मालिकांमधू आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. त्यांच्या ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’,  ‘लोकमान्य’, ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटांमध्ये सुबोधनं काम केलं आहे. तसेच ‘तुला पाहते रे’ या मालिकेमधून सुबोध प्रेक्षकांच्या भेटीस आला. अशातच आता सुबोधच्या ‘संगीत मानापमान’ या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात सुबोधबरोबरच आणखी कोणते कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत? याकडे आता आनेकांचे लक्ष लागले आहे. 

आणखी वाचा – “जिथे हिंदू तिथे लव्ह जिहाद”, उरणमधील तरुणीच्या निघृण हत्येवर केतकी चितळेची प्रतिक्रिया, म्हणाली, “आपल्या मुली गायब होतात आणि…”

दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन सुबोधने केलं असून या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार शंकर-एहसान-लॉय   यांचे संगीत लाभले आहे. जिओ स्टुडिओ प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित व कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या अजरामर कलाकृतीला प्रेरित संगीतमय हा चित्रपट येत्या १ नोव्हेंबर प्रदर्शित होणार आहे.        

Tags: marathi entertainment newsSangeet Manapmaan TeaserSangeet Manapmaan Teaser NewsSangeet Manapman
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dev anand son suneil anand dies
Entertainment

देव आनंद यांच्या मुलाचे निधन, ७०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, अविवाहित राहिले कारण…

जुलै 29, 2026 | 10:34 am
 Badshah Isha Rikhi Marriage in Trouble
Entertainment

“मी गप्प राहिले कारण मला भीती वाटत होती”, सुप्रसिद्ध गायकाच्या पत्नीची धक्कादायक पोस्ट, चार महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न…

जुलै 28, 2026 | 10:24 am
stories of Abhay Verma
Entertainment

मुलांनी घेरलं, घाणेरडं कृत्य केलं आणि…; भूमिकेची तयारी करताना सुप्रसिद्ध अभिनेत्याला समजलं होतं ट्रान्सजेंडर, म्हणालेला…

जुलै 27, 2026 | 11:10 am
Jasmin Bhasin Health Update
Entertainment

“मला गंभीर आजार आहे”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुबईच्या रुग्णालयात सुरु होते उपचार, खूप वेदना आणि…

जुलै 27, 2026 | 9:55 am
Next Post
Bigg Boss Marathi 5 Updates

"शो बघायची इच्छाच नाही", 'बिग बॉस मराठी'मध्ये येताच अंकिता वालावलकर, सुरज चव्हाणवर भडकले प्रेक्षक, म्हणाले, "ओव्हरस्मार्ट आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.