देशासाठी कालचा दिवस ऐतिहासिक असा होता, कारण चांद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या सॉफ्ट लॅंडिंग केले. चांद्रयान मोहिमेला मिळालेले यश देशवासियांसाठी अभिमानास्पद असून देशभरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. इसरोच्या वैज्ञानिकांवर देश-विदेशातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यात कलाकार मंडळीही मागे पडली नसून बॉलीवूडसह मराठी कलाकारांनी देखील या क्षणाचा जल्लोष साजरा करत वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या आहे. (Pooja Sawant instagram Video)
मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये झळकलेले अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे फोटोज व व्हिडिओज आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करते. असाच एक व्हिडिओ नुकताच पूजाने शेअर केला आहे. ज्यात हा जल्लोष साजरा करताना ती भावुक झाली.
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पूजा चांद्रयान-३ चे प्रक्षेपण पाहत होती. जेव्हा चांद्रयान-३ चं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झालं, तेव्हा तिने एकाच जल्लोष केला. शिवाय, हे प्रक्षेपण पाहताना पूजाच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले होते. हा व्हिडिओ शेअर करत पूजाने वैज्ञानिकांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.
हे देखील वाचा – “तीन ते चार वर्ष आजाराशी झुंज आणि…”, आईच्या निधनानंतर अजिंक्य देव भावुक, म्हणाला, “वर्षभरापूर्वी बाबा गेले अन्…”
“भारताचा हा ऐतिहासिक क्षण आणि त्या मागची उत्कंठा, स्वाभिमान, प्रेम हे कायमचं कॅमेरामध्ये कैद करायचे ठरवलं. एका कार्यक्रमासाठी बाहेर असल्यामुळे हा क्षण अनुभवण्यासाठी माझ्यासोबत कोणीच न्हवतं. पण खर सांगू का ? काल कुणीच एकटं न्हवतं. काल आपण सगळे ‘एक’ होऊन ह्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षिदार ठरलो. इसरोचे त्रिवार अभिनंदन, कलाम सर, आम्हाला माहीत आहे. तुम्ही जिथे कुठे असाल, खुप खुष असाल… we miss you. वंदे मातरम्”, असं पूजा सावंतने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हे देखील वाचा – “तिचं दुसरं लग्न लावून दिलं कारण…”, आईचं लग्न झाल्यानंतर सिद्धार्थ चांदेकरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, “आयुष्यातील एकटेपणा..”
अभिनेत्री पूजा सावंत हिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. गेल्यावर्षी तिचा ‘दगडी चाळ २’ चित्रपट प्रदर्शित झालं असून लवकरच ती ‘पोश्टर बॉईज २’ चित्रपटात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी पूजाने एका पॉडकास्टला मुलाखत दिली, ज्याची जोरदार चर्चा झाली होती. (Pooja Sawant instagram Video)