शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पूजा सावंतच्या वाढदिवसाला नवऱ्याची रोमँटिक पोस्ट, युनिक टोपण नावाने मारतो हाक, म्हणाला, “तुझ्या हास्यामुळे…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 25, 2025 | 1:16 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi actress Pooja Sawant birthday husband Siddesh Chavan posted a special photo for her and wished

पूजा सावंतच्या वाढदिवसानिमित्त नवरा सिद्धेश चव्हाणची खास पोस्ट,

आपल्या मनमोहक हास्याने व मनमोहक सौंदर्याने मराठीसह हिंदी प्रेक्षकांवर मोहिनी घालणारी मराठमोळी ‘कलरफुल’ अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. ‘मन धागा धागा जोडते नवा’ म्हणत पूजाने मराठीसह हिंदी सिनेविश्वातदेखील तिच्या अभिनयाचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. आपल्या अभिनयाने व हटके स्टाईलमुळे चर्चेत राहणारी पूजा तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली. पूजाने गेल्यावर्षी २८ फेब्रुवारी रोजी सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली. लग्नानंतर पूजा तिच्या नवऱ्यासह ऑस्ट्रेलियाला गेली. दरम्यान अनेकदा कामानिमित्त भारतात येत असते. नवऱ्यासह लग्नानंतरचे काही खास क्षण एन्जॉय करताना दिसत आहे. पूजाचा नवरा हा मूळचा भारतातला असला तरी तो ऑस्ट्रेलियात कामानिमित्त राहतो. (Siddesh Chavan wish Pooja Sawant)

अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. तिच्या या वाढदिवसानिमित्त मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार मंडळी तिला शुभेच्छा देत आहेत. या वाढदिवसानिमित्त तिला नवऱ्यानेही खास पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर सिद्धेशने पूजासाठी विशेष फोटो पोस्ट केला आहे आणि तला शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये त्याने पूजाला शुभेच्छा देताना असं म्हटलं आहे की, “तुझ्या तेजस्वी हास्याने जसे माझे जीवन उजळते, तसंच ते हास्य जगाला उजळत राहो, वाढदिवसाच्या शुभेच्छा, बोजू!”

आणखी वाचा – महाराष्ट्र सरकार शाहरुख खानला देणार तब्बल नऊ कोटी रुपये, ‘मन्नत’साठी गौरीने केली होती याचिका, नेमकं प्रकरण काय?

अभिनेत्री पूजा सावंतने जवळपास २०१० साली आलेल्या ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे, मात्र ‘दगडी चाळ’ या चित्रपटातून तिला कलरफुल हे नाव मिळाले. पूजा सावंतचे अनेक चाहते आहेत. याशिवाय तिने अनेक हिंदी चित्रपटांतही काम केले आहे. मराठीसह हिंदी कलाविश्वातही तिचा मोठा चाहतावर्ग आहे.  

आणखी वाचा – Bigg Boss फेम प्रसिद्ध युट्यूबवर FIR नोंदवण्याचे कोर्टाचे आदेश, पाठलाग व धमकीचा आरोप

दरम्यान, पूजा सावंतचा नवरा सिद्धेश चव्हाण मुळचा मुंबईचाच आहे. कामानिमित्त तो ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला आहे. तो फायनान्स क्षेत्रात काम करतो. विशेष म्हणजे, पूजाचं स्थळ येण्यापूर्वी त्याला माहीतच नव्हतं की पूजा सावंत नावाची एक अभिनेत्री आहे. आपल्याला एका अभिनेत्रीचं स्थळ आलंय हे समजल्यावर त्यालाही धक्काच बसला होता.

Tags: pooja sawantpooja sawant birthdaySiddesh Chavan wish Pooja Sawant
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
vivian dsena party

विवियन डिसेनाच्या पार्टीमध्ये करणवीर मेहरा का नव्हता?, कारण विचारताच अभिनेत्याचे दुर्लक्ष, दोघांमध्ये मोठा वाद

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.