आपल्या मनमोहक हास्याने व मनमोहक सौंदर्याने मराठीसह हिंदी प्रेक्षकांवर मोहिनी घालणारी मराठमोळी ‘कलरफुल’ अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. ‘मन धागा धागा जोडते नवा’ म्हणत पूजाने मराठीसह हिंदी सिनेविश्वातदेखील तिच्या अभिनयाचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. आपल्या अभिनयाने व हटके स्टाईलमुळे चर्चेत राहणारी पूजा तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली. पूजाने गेल्यावर्षी २८ फेब्रुवारी रोजी सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली. लग्नानंतर पूजा तिच्या नवऱ्यासह ऑस्ट्रेलियाला गेली. दरम्यान अनेकदा कामानिमित्त भारतात येत असते. नवऱ्यासह लग्नानंतरचे काही खास क्षण एन्जॉय करताना दिसत आहे. पूजाचा नवरा हा मूळचा भारतातला असला तरी तो ऑस्ट्रेलियात कामानिमित्त राहतो. (Siddesh Chavan wish Pooja Sawant)
अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. तिच्या या वाढदिवसानिमित्त मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार मंडळी तिला शुभेच्छा देत आहेत. या वाढदिवसानिमित्त तिला नवऱ्यानेही खास पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर सिद्धेशने पूजासाठी विशेष फोटो पोस्ट केला आहे आणि तला शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये त्याने पूजाला शुभेच्छा देताना असं म्हटलं आहे की, “तुझ्या तेजस्वी हास्याने जसे माझे जीवन उजळते, तसंच ते हास्य जगाला उजळत राहो, वाढदिवसाच्या शुभेच्छा, बोजू!”

अभिनेत्री पूजा सावंतने जवळपास २०१० साली आलेल्या ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे, मात्र ‘दगडी चाळ’ या चित्रपटातून तिला कलरफुल हे नाव मिळाले. पूजा सावंतचे अनेक चाहते आहेत. याशिवाय तिने अनेक हिंदी चित्रपटांतही काम केले आहे. मराठीसह हिंदी कलाविश्वातही तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
आणखी वाचा – Bigg Boss फेम प्रसिद्ध युट्यूबवर FIR नोंदवण्याचे कोर्टाचे आदेश, पाठलाग व धमकीचा आरोप
दरम्यान, पूजा सावंतचा नवरा सिद्धेश चव्हाण मुळचा मुंबईचाच आहे. कामानिमित्त तो ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला आहे. तो फायनान्स क्षेत्रात काम करतो. विशेष म्हणजे, पूजाचं स्थळ येण्यापूर्वी त्याला माहीतच नव्हतं की पूजा सावंत नावाची एक अभिनेत्री आहे. आपल्याला एका अभिनेत्रीचं स्थळ आलंय हे समजल्यावर त्यालाही धक्काच बसला होता.