शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : मृण्मयी देशपांडेची महाबळेश्वरमधील घरात सुरु आहे धमाल, करणार स्ट्रॉबेरीची शेती, दाखवला संपूर्ण परिसर

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 24, 2024 | 1:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actress Mrunmayee Deshpande shared a special video from her home in Mahabaleshwar

मृण्मयी देशपांडेने तिच्या महाबळेश्वरमधील घरातून खास व्हिडीओ केला शेअर

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. तिने वेगवेगळ्या भूमिका साकारत सिनेसृष्टीला स्वतःची दखल घ्यायला भाग पाडलं. ‘मन फकिरा’, ‘बेभान’, ‘फतेशिकस्त’, ‘बोगदा’, ‘चंद्रमुखी’, ‘नटसम्राट’, ‘फर्जंद’, ‘मोकळा श्वास’ यासारख्या अनेक चित्रपटामधून ती आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. मृण्मयीने अभिनय क्षेत्र तर गाजवलंच आहे पण ती अभिनयाबरोबरच शेती व्यवसायाकडेही वळली आहे. गेल्या काही वर्षांपासून ती शेतीत रमली आहे. मृणयमी तिच्या पतीबरोबर महाबळेश्वर येथे शेती करण्यात व्यग्र आहे. (Mrunmayee Deshpande Mahabaleshwar House)

मृण्मयी २०२० पासून मुंबई सोडून महाबळेश्वर येथे राहत आहे. तिने महाबळेश्वरला छोटंसं टुमदार घरही बांधलं आहे. तिने शेतीपूरक व्यवसायही सुरू केला आहे. ती अनेकदा तिचे तिच्या शेतातले फोटो आणि व्हिडीओही चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अशातच तिने आता तिच्या सोशल मीडियाद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमधून तिने तिच्या घराबाहेर ऊन पडल्याचे दाखवले आहे. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. गेल्या काही दिवसांतील सततच्या पावसाने इथलं वातावरण सतत पावसाळी असतं. अशा ठिकाणी ऊन जास्त पडत नाही. पण अनेक दिवसांनी इथे ऊन पडले असून मृण्मयीने याचा आनंद व्यक्त केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Mrunmayee Deshpande – Rao (@mrunmayeedeshpande)

आणखी वाचा – घरोघरी मातीच्या चुली! आलिया भट्टने स्वतःच्याच नणंदेला म्हटलं चुगलीखोर, सतत गॉसिप करते आणि…

मृण्मयीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “आजचा महाबळेश्वरचा दिवस खूप खास आहे. कारण जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर अशा चार महिन्यांनी इथे ऊन पडलं आहे. खूप दिवसांनी इथे ऊन पडलं आहे. इथे आता जमीन आहे तिथे आम्ही स्ट्रॉबेरी लावणार आहोत. ऊन पडल्यामुळे आम्ही खूप खुश आहोत. आम्ही पटापट कपडे धुवायला घेतले. कारण माहीत नाही आज ऊन आहे तर उद्या असेल की नाही”. दरम्यान या व्हिडीओमध्ये ऊन पडल्यामुळे मृण्मयीच्या पाळीव श्वानांनीही आनंद झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “इथे माझा मृत्यू झालाच तर…”, घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकला वैतागून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “बेशिस्त ट्रक चालक…”

मृण्मयीने हा खास व्हिडीओ शेअर करत कॅप्श्नमध्ये स्वरचित कविताही लिहिली आहे. “धरती होती आसुसलेली.. आकाशाची निळी निळाई.. ऊन कोवळे मिलन करता.. बीज तान्हुले जन्मा येई…”  अशी खास कविता करत मृण्मयीने तिला आनंद झाल्याचे सांगितले आहे. मृण्मयीने शेअर केलेल्या या व्हिडीओ चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “खूप छान”, “किती तो आनंद”, “ताईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा आहे” अशा अनेक कमेंट्स करत नेटकर्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे   

Tags: marathi actressmrunmayee deshpandeMrunmayee Deshpande Mahabaleshwar House
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss OTT 3 fame Armaan Malik's fourth marriage netizens finds Sandeep name in laksh mehndi video

अरमान मलिकने गुपचूप उरकलं चौथं लग्न?, मुलांना सांभाळणाऱ्या व्यक्तीशीच जुळलं प्रेम, पायल-कृतिकाचं काय होणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.