बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही तिची अभिनय व स्टायलिंगमुळे कायमच चर्चेत राहत असते. नुकताच तिचा ‘जिगरा’ चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटामुळे तिची चांगलीच चर्चा रंगली. अशातच अभिनेत्रीने तिच्या नणंदेविषयी एक खुलासा केला आहे. आलिया भट्टची विनोदबुद्धी आणि स्पष्टवक्तेपणाची शैली अनेकदा चर्चेत असते. अशातच आलियाने नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान तिचा पती रणबीर कपूर व त्याची बहीण रिद्धिमा कपूर यांच्याशी संबंधित एक मनोरंजक खुलासा केला. आलियाने नणंद रिद्धिमा कपूरला ‘चुगलीखोर’ असं म्हटलं आहे. रणबीरपेक्षा रिद्धिमाची गॉसिप जास्त असल्याचे तिने यावेळी म्हटलं. (Alia Bhatt Called Riddhima Kapoor Gossiper)
आलिया भट्टचे कपूर कुटुंबाशी घट्ट नाते आहे, रणबीर कपूरबरोबर लग्न झाल्यानंतर आलिया कपूर कुटुंबाचा अविभाज्य भाग बनली आहे. रिद्धिमा कपूर, जी रणबीरची मोठी बहीण आहे, ती एक प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर आहे आणि तिच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. आलिया आणि रिद्धिमा यांचे खास आणि मैत्रीपूर्ण नाते आहे आणि दोघेही अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात. रिद्धिमा सध्या ‘फॅब्युलस लाईव्ह्स ऑफ बॉलिवूड वाइव्हज’च्या तिसऱ्या सीझनमध्ये आहे. नणंदेच्या शोच्या प्रमोशन दरम्यान, आलियाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो ‘गलट्टा इंडिया’ने शेअर केला आहे.
मुलाखतीत रिद्धिमाच्या विनोदी व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना आलिया म्हणाली की, “जेव्हाही ती कुटुंबाबरोबर असते. तेव्हा रिद्धिमा नेहमी काहीतरी नवीन आणि मसालेदार गप्पा मारत असते”. याबद्दल आलिया गंमतीने म्हणाली की, “तुम्हाला बॉलिवूड किंवा कुटुंबाविषयी ताज्या बातम्या जाणून घ्यायच्या असतील तर, रिद्धिमापेक्षा चांगला कोणी नाही. तिच्याकडे नेहमीच काहीतरी मजेदार आणि धक्कादायक माहिती असते. रणबीरला गॉसिपमध्ये फारसा रस नाही, पण रिद्धिमाला हे सर्व आवडते”.
आणखी वाचा – सलमान खानकडून ५ कोटींची खंडणी मागणारा मुंबई पोलिसांच्या ताब्यात, जमशेदपूरमधून भाजी विक्रेत्याला अटक
रिद्धिमा कपूर केवळ गॉसिपसाठीच नाही तर तिच्या कुटुंबाप्रती असलेल्या समर्पणासाठीही ओळखली जाते. ती त्याचा भाऊ रणबीर आणि आई नीतू कपूर यांच्या खूप जवळ आहे. आलियाने पुढे रिद्धिमाचे कौतुक करत म्हटलं की, “ती खूप गोड आणि दयाळू व्यक्ती आहे. ती राहाची आवडती आत्या आहे. रिद्धिमा तिची नणंद नसून बहिणीच आहे”. दरम्यान, रिद्धिमा कपूर साहनीने ‘फॅब्युलस लाईव्ह्स ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ शोमधून पडद्यावर पदार्पण केले आहे. ती व्यवसायाने ज्वेलरी डिझायनरदेखील आहे.