‘बिग बॉस ओटीटी २’ मुळे प्रसिद्धी झोतात आलेले नाव म्हणजे अरमान मलिक. अरमान मलिक हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींबरोबर ‘बिग बॉस ओटीटी २’ च्या घरात आला होता. अरमान दोन्ही पत्नींबरोबर ‘बिग बॉस’च्या घरात दाखल झाल्याने त्याच्यावर जोरदार टीका ही करण्यात आली होती. अरमान मलिकने पायलबरोबर घटस्फोट न घेता कृतिकाबरोबर लग्न केले. कृतिका आणि पायल आता एकाच घरात राहतात. अशातच आता सोशल मीडियासह सर्वच माध्यमांवर त्याच्या चौथ्या लग्नाच्या चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. (Armaan Malik Fourth Marriage)
अरमानची पत्नी कृतिकाला एक मुलगा तर पायलला एक मुलगी… असे दोन मुले आहेत. सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्याबद्दल प्रत्येक अपडेट शेअर करताना मलिक कुटुंबिय कायमच दिसतात आणि त्यांनी करवा चौथचाही व्लॉग पोस्ट केला. त्यांच्या मुलांची केअरटेकर लक्षदेखील व्लॉग तयार करते आणि करवा चौथच्या दिवशी तिनेही व्लॉग रेकॉर्ड केला. तिचा व्लॉग पाहून नेटकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात आणून दिली की, तिच्या हातावरील मेहंदीमध्ये संदीप उर्फ अरमान मलिकचे नाव लिहिले आहे.
तिची ही मेंदी पाहून खळबळ उडाली आणि अरमान मलिकने चौथे लग्न केले की काय, असा सवाल उपस्थित करण्यात येतो आहे. लक्ष ही केअरटेकर मलिक कुटुंबाच्या खूप जवळची आहे आणि ती नेहमी त्यांच्या सर्व व्लॉग्समध्ये त्यांच्याबरोबर असते. यामुळे अरमान मलिकने चौथ्यांदा लग्न केल्याच्या चर्चा होत आहेत. अरमानची केअर टेकर कुटुंबाच्या खूप जवळ आहे आणि ती नेहमीच सर्व व्लॉग्समध्ये दिसते.
आणखी वाचा – Video : मृण्मयी देशपांडेची महाबळेश्वरमधील घरात सुरु आहे धमाल, करणार स्ट्रॉबेरीची शेती, दाखवला संपूर्ण परिसर
करवा चौथच्या व्लॉगमध्येही अरमान मलिक आपल्या पत्नींसाठी तीन भेटवस्तू आणताना दिसला होता, त्यापैकी त्याने फक्त दोन अंगठ्या दिल्या आणि तिसरी अंगठी बाजूला ठेवली. यामुळे केअर टेकर अरमानची तिसरी पत्नी म्हणून मलिक कुटुंबाबरोबर राहते की काय अशी चर्चा होत आहे. त्यामुळे आता अरमान मलिक पुन्हा एकदा त्याच्या लग्नामुळे चांगलाच चर्चेत आला आहे.