Mrunal Dusanis New Business : मराठी सिनेसृष्टीत अशी अनेक कलाकार मंडळी आहेत जी अभिनयाबरोबरच व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असल्याचं पाहायला मिळतं. अनेक कलाकार मंडळींनी अभिनयाची आवड जोपासत काहीतरी नवीन सुरु केलेलं पाहायला मिळालं. बरीचशी अशी कलाकार मंडळी आहेत ज्यांनी अभिनय सोडून व्यवसाय क्षेत्रालाही प्राधान्य दिलं आहे. तर काहींनी अभिनयाबरोबर व्यवसाय क्षेत्र सांभाळण्याचा समतोल राखला आहे. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने नवं काहीतरी सुरु करणार असल्याचं सांगितलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानिस.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर करत नवीन काहीतरी सुरु करणार असल्याच सांगितलं होतं. तेव्हापासून अभिनेत्री कोणता नवा व्यवसाय सुरु करते याची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली होती. “लवकरच काहीतरी नवीन घेऊन येत आहोत. तुम्ही ओळखू शकता का नेमकं काय सुरु आहे?”, असं कॅप्शन देत तिने एका जागेचं इंटिरियर डिझायनिंग करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. यानंतर आता अभिनेत्रीने हॉटेल व्यवसायात पदार्पण केलं असल्याचं समोर आलं आहे. व्हिडीओ शेअर करत तिने याबाबतची माहिती दिली आहे.
मृणाल व तिचा पती नीरज मोरेने त्यांचं नवं हॉटेल सुरु केलं आहे. मृणाल गेली काही वर्ष तिच्या नवऱ्याबरोबर अमेरिकेत स्थायिक होती. लेक झाल्यानंतर अभिनेत्री चार वर्षांनी पुन्हा भारतात परतली आहे. भारतात परतल्यानंतर अभिनेत्रीने नवऱ्यासह मिळून नवा व्यवसाय सुरु केला आहे. ठाण्यात सुरु केलेलं हे हॉटेल हिरानंदानी इस्टेट परिसरात आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या नव्या हॉटेलची झलकही पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – एकही हिट चित्रपट नाही, तरीही आहे बॉलिवूड विश्वातील सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्री, संपत्ती ऐकून व्हाल थक्क
मृणाल दुसानिसच्या पतीने सुरु केलेल्या या बिस्त्रोचं नाव ‘Belly Laughs’ असं आहे. मृणालच्या चाहत्यांनी या नव्या व्यवसायासाठी तिला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. आता लवकरच टेलिव्हिजनची ही लाडकी सून ‘स्टार प्रवाह’च्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या नव्या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे, विजय आंदळकर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. १६ डिसेंबरपासून सायंकाळी ७ वाजता ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येईल.