सध्या कॉलेज जाणाऱ्या मुली असो किंवा ऑफिसला जाणाऱ्या महिला असो सगळ्याच जणी सूटसुटीत कपडे म्हणून कुर्ती घेण्याचा विचार करतात. पण कुर्तीमध्येदेखील अनेक प्रकार असलेले पाहायला मिळतात. यामध्ये कॉटन कपड्यातील कुर्ती, सिल्क कुर्ती असे अनेकविध प्रकार उपलब्ध असतात. पण प्रत्येकीच्या कपाटात एक तरी लखणवी कुर्ती असावी असे वाटत असते. पण लखनवी कुर्ती महाग असल्याने सगळ्याच महिलांना परवडत नाही. तसेच हवी त्या साईजमध्ये कुर्ती मिळेल अशी शंकादेखील प्रत्येक महिलेच्या मनात येते. मात्र आता आपण आता हीच शंका दूर करणार आहोत. आम्ही अशी एक जागा शोधून काढली आहे ज्यामुळे कुर्ती घेणे सहज सोपे होईल. (lakhnowi kurti in budget)
तुम्हाला आकर्षक आणि स्वस्त दरात लखनवी कुर्ती खरेदी करायची असेल तर वांद्रे पूर्व येथे कमल स्टोअरमध्ये अशा प्रकारचे कुर्ते उपलब्ध होऊ शकतात. तसेच या ठिकाणी लखनवी कुर्तामध्ये बरेच प्रकार आहेत. त्याचप्रमाणे उत्तम क्वालिटी कापड आणि डिझाईनदेखील तुम्हाला मिळू शकतील. या दुकानामध्ये सध्या लखनवी कुर्त्यांवर सुपर सेल सुरू आहे. तसेच अगदी मोठ्या म्हणजे प्लस साईजमध्ये उपलब्ध आहेत. स्मॉल साईज ते 10 xl साईजपर्यंत अनेक व्हारायटी आणि उत्तम क्वालिटीच्या कुर्ती उपलब्ध आहेत. तसेच शॉर्ट कुर्ती, मिडियम आणि लॉन्ग अशा टाइपमध्ये कुर्ती मिळतात.त्याचप्रमाणे पूर्ण सेटदेखील तुम्हाला इथे मिळेल.
आणखी वाचा – “कधीही माझा मृत्यू होईल…”, आमिर खानचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “वय वाढत असल्यामुळे…”
साईजबरोबरच या कुर्ती बजेट फ्रेंडलीदेखील आहेत. केवळ ४५० रुपयांपासून किंमत सुरु होते. शॉर्ट कुर्ती व लॉन्ग कुर्ती ५०० रुपयांमध्येही उपलब्ध आहेत. तसेच तुम्हाला कुर्ता, पायजमा व ओढणी असा सेट खरेदी करायचा असेल तर १४०० रुपयांपासून उपलब्ध असून २००० रुपयांपर्यंत मिळू शकतील. यामध्ये खूप फ्रेश रंगही आहेत. तसेच वेगवेगळ्या डिझाईनदेखील बघायला मिळतील.
त्यामुळे तुम्ही जर खरच लखनवी कुर्तीचे चाहते असाल. मात्र तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये घ्यायच्या असतील तर कमल स्टोअर, शॉप नंबर C 37, एल्को मार्केट, हिल रोड, वांद्रे पश्चिम, या पत्त्यावर जाऊन कुर्ती खरेदी करु शकता.