टेलिव्हीजनवरील प्रसिद्ध मालिका ‘अनुपमा’ ही मालिका चांगलीच चर्चेत आली आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री रुपाली गांगुली ही मुख्य भूमिकेमध्ये दिसून येत आहे. ही मालिका सुरु झाल्यापासून मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिली आहे. काही दिवसांपूर्वी रुपालीच्या सावत्र मुलीने तिच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. यामुळे रुपालीने सावत्र मुलीवर मानहानीचा खटला दाखल करत ५० कोटी रुपयांची मानहानी रक्कम मागितली. अशातच आता ‘अनुपमा’च्या सेटवर असा काही प्रसंग घडला ज्यामुळे आता मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. सेटवर मोठा प्रसंग घडला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (anupama serial set incidence)
‘अनुपमा’ मालिकेच्या सेटवर मोठा प्रसंग घडला. सेटवर एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. सेटवर असिस्टंट लाइटमॅनचा मृत्यू झाला आहे. शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त हाती आले आहे. यामुळे सेटवर एकच गोंधळ उडाला होता. ही घटना १४ नोव्हेंबर रोजी घडली असल्याचेही समोर आले आहे. शॉक लागल्यानंतर सदर व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटणेमुळे सेटवरील सगळे जण मोठ्या चिंतेत आले आहेत.
मात्र या सगळ्याबद्दल अद्याप काही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. याबद्दलचा रिपोर्ट मुंबईतील आरए कॉलनी येथील पोलिस स्थानकात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी सेटवर भेट देऊन संपूर्ण प्रकणाची तपासणी केली. याबद्दल ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सीने एम्प्लॉइज’चे अध्यक्ष बीएन तिवारी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, “तो व्यक्ती सेटवर काम करत होता आणि त्या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे त्याचा मृत्यू झाला. तसेच तो व्यक्ती सेटवर नवीन होता. पण आम्ही या प्रकणारची पूर्ण तपासणी करु आणि त्याच्या कुटुंबाला भरपाई मिळेल यासाठी पूर्ण प्रयत्न करु”.
दरम्यान ‘अनुपमा’ ही मालिका खूप प्रसिद्ध आहे. या टीव्ही शोने रुपाली गांगुलीला खूप नाव आणि प्रसिद्धी मिळवून दिली. रिपोर्ट्सनुसार, ती सध्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टेलिव्हिजन अभिनेत्रींपैकी एक आहे. एका रिपोर्टनुसार, त्याला फीमध्ये मोठी रक्कम मिळते. शोमधील भूमिकेसाठी तिला प्रति एपिसोड तीन लाख रुपये मिळतात.