शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“यावेळी मतदान करु शकणार नाही पण…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट, म्हणाली, “दुर्दैवाने…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 20, 2024 | 4:23 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi actress Mithila Palkar shared a post on social media about not being able to vote for some reason

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मतदानापासून राहिली वंचित, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली...

आज २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघात आज मतदान सुरु झालं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व नागरिकांनी मतदान करत आपला हक्क आणि सामाजिक जबाबदारी पार पाडणं आवश्यक आहे. यासाठी राज्यभरात मोठ्या संख्येनं मतदार मतदानासाठी बाहेर पडताना दिसत आहेत. सिनेइंडस्ट्रीतल्या अनेक सेलिब्रिटींनीही आपला मतदानाचा हक्क बजावल्याचं दिसून आलं. या कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले. मतदानानंतरचे सेल्फी व फोटो कलाकारांनी शेअर केले आहेत आणि सर्वांना मतदान करण्याचे अवहानही केले आहे. (Mithila Palkar Not Able To Vote)

मात्र यादरम्यान एका अभिनेत्रीची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. अभिनेत्री मिथिला पालकरला तिचा यंदाचा मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही अआणि याबद्दल अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. मिथिला सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते आणि तिच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. अशातच तिने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

आणखी वाचा – मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही आवाहन केलं अन्…; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

आजच्या दिवशी सगळे मतदानासाठी बाहेर पडले असताना मिथिला मात्र मतदान करु शकणार नाही असं तिने म्हटलं आहे. याबद्दल तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे आणि याद्वारे तिने असं म्हटलं आहे की, “मी यावेळी मत देऊ शकत नाही. दुर्दैवाने वेळच चुकीची आहे. पण महाराष्ट्र, कृपया जमलं तर तुम्ही मतदान नक्की करा. आपल्यासाठी मत द्या. कारण आपण अनेक चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहोत”. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्थात मिथिलाच्या मतदान न करण्यामागचे कारण समजू शकलेलं नाही.

आणखी वाचा – ए. आर. रहमानच्या घटस्फोटाच्या निर्णयानंतर अशी झालीय मुलांची अवस्था, पोस्टद्वारे व्यक्त केलं दु:ख, म्हणाले, “तुमच्या प्रार्थनेत…”

पण अभिनेत्री सध्या परदेशात असल्याचं तिच्या आधीच्या स्टोरीवरुन कळत आहे. ती सध्या नॉर्वेमध्ये आहे. यामुळे मिथिला यावेळी मतदानापासून वंचित राहिली आहे. दरम्यान, रितेश व जिनीलिया, रवी जाधव, प्राजक्ता माळी, सायली संजीव, बांदेकर व सराफ कुटुंबिय तसंच सोनाली कुलकर्णी, वैदही परशुरामी, उमेश व प्रिया बापट, जुई गडकरी, सावनी रवींद्र अशा अनेकांनी आज मतदान केले आहे.  

Tags: marathi actressmithila palkarMithila Palkar Not Able To Vote
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Bigg Boss Marathi fame Aastad Kale shared a post on Instagram regarding the Virar Vinod Tawde money distribution case.

“प्रत्येकी(ला) ३००० द्यायचे म्हणून...”, विरारमधील ‘त्या’ घटनेवर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “आता या ‘विनोदाचं’...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.